विरावली गावाचा विकास करा.. राष्ट्रवादीचे खासदार रक्षा खडसेंकडे मागणी!

सप्टेंबर 19, 2022 2:51 PM

Raver News-जळगाव लाईव्ह न्यूज । अमीर पटेल । विरावली गावाचा संपूर्ण विकास व्हावा, अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष ॲड. देवकांत पाटील यांनी खासदार रक्षा खडसे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. यावेळी खासदारखडसे यांनी सर्व मागण्या, समस्या लवकरात लवकर सोडवणार असल्याचे आश्वासन दिले.

jalgoan 2 1

खासदार रक्षा खडसे या जन संपर्क अभियाननिमित्त विरावली गावात आल्या असता विरावली विकास सोसायटीच्या वतीने संस्थेचे चेअरमन अर्जुन पाटील व व्हाईट चेअरमन नरेंद्र सोनवणे व संचालक मंडळाने स्वागत केले. या कार्यक्रमात सर्व संचालक मंडळ सह गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमात राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष यांनी व काही गावकऱ्यांनी गावकऱ्यांच्या वतीने विविध समस्या व उपाय योजना संदर्भात मागणी केली.

त्यात शेतकरी कर्ज माफी योजनेचे अनेक लाभार्ती वंचित राहिल्याचे तसेच नियमित कर्जदार प्रोत्साहन लवकर मिळावे, हवामानाचे पीक नुकसानाची विमाच्या लाभ काही शेतकऱ्यांना लाभ न मिळाल्याबाबत, वार्ड क्र.3 मध्ये बस स्थानक ते हनुमान मंदिर ते सुरेश बंडू पाटील यांचे शेत हा रस्ता खासदार निधीच्या माध्यमातून कॉंक्रिटीकरण करून द्यावा तसेच राज्यात लम्पी या त्वचा रोगाशी संबंधित गाई व बैल या आपल्या जनावरांना संसर्गजन्य रोगाने ग्रासले असून त्यांच्यावर होणारे उपचार हे मोफत व्हावे, ज्या पशुपालकांचे जनावरे लम्पि या संसर्गजन्य आजारामुळे मृत्युमुखी पडली असतील त्यांना नुकसान भरपाई मिळावी.

यावेळी माजी जि.प.सदस्य रवींद्र पाटील, माजी जी.प.सदस्या सविता भालेराव, लीलाधर चौधरी , विलास पाटील, उज्जनसिंग पाटील, अतुल भालेराव तर विरावली गावातून ग्रामपंचायत सदस्य तथा राष्ट्रवादीचे युवक तालुका अध्यक्ष ॲड.देवकांत पाटील, भारतीय जनता पार्टीचे ठाणे जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद पाटील, विकास सोसायटीचे माजी चेअरमन संजय पाटील, संचालक गुलाब पाटील, संचालक बाजीराव पाटील, संचालक संजय मोतीराम पाटील, माजी संचालक शरद पाटील, दिनकर पाटील, भावडू पाटील , युवराज पाटील , पवन पाटील , गिरीश पाटील, गणेश पाटील, योगेश पाटील, तेजपाल पाटील , सुभाष पाटील, बादशाह पाटील, विजयसिंह पाटील, हिरालाल पाटील, यशवंत पाटील, अजबराव पाटील , सुरेश पाटील,नानाजी पाटील ,फकीरा पाटील , राजेश निळे आदी उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now