⁠ 
शुक्रवार, मार्च 29, 2024

धक्कादायक ! मैत्रीणीचे लग्न मोडावे यासाठी सोशल मीडियावर फोटो टाकून केली बदनामी

जळगाव लाईव्ह न्यूज | २० जानेवारी २०२२ | गेल्या काही वर्षात सोशल मीडिया (Social media) वापराच्या बाबतीत तरुणाईचा कल प्रचंड वाढला आहे. त्यामुळे जगातल्या कुठल्याही कोपऱ्यात बसून कुणाशीही संवाद साधणं अगदी सोपं झालं आहे. अशात सोशल मीडियावरून होणाऱ्या फसवणुकीचं प्रमाण देखील वाढलं आहे. अशीच एक घटना जळगाव जिल्ह्यात घडलीय.

रावेर तालुक्यातील एका मैत्रीणीचे लग्न मोडावे यासाठी तिच्याच अज्ञात व्यक्तीने मित्रासोबत असलेले फोटो सोशल मीडियावर टाकून तिची बदनामी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्‍यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार असे की, जिल्ह्यातील एका गावात १९ वर्षीय तरुणी वास्तव्यास आहे. ती शिक्षण घेत असून तिचे लग्न जुळले आहे. तरुणीचे लग्न तुटावे या कारणाने इन्टाग्रामवर विशूनेमाने हे खाते असलेल्या व्यक्तीने तरुणीचे तिच्या मित्रासोबत फोटो इन्स्टाग्रामवरुन टाकले.

तसेच तरुणीचे लग्न जुळलेल्या तिच्या भावी पतीलाही संबंधित फोटो पाठवून तिची बदनामी केली, अशी तक्रार तरुणीने जळगाव सायबर पोलिसात दिली असून त्यावरुन विशूनेमाने हे खाते असलेल्या अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरिक्षक लिलाधर कानडे हे करीत आहेत.

हे देखील वाचा :