---Advertisement---
पाचोरा भडगाव

पाचोरा व भडगाव भागात ओला दुष्काळ जाहीर करा

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ ऑक्टोबर २०२२ । पाचोरा व भडगाव तालुक्यात मुसळधार पाऊस झाल्यामुळे शेती पिकाचे नुकसान झाले आहे. दिवाळी आधी शेतकऱ्याच्या घरी आनंद येण्याआधी चिंता आली आहे. त्यामुळे पाचोरा व भडगाव तालुक्यातील शेतकरी हवालदिल झालेला आहे अशा अडचणीच्या अवस्थेत शेतकरी असताना प्रशासनाने आपले अधिकाराचा वापर करून शासनाच्या वरिष्ठ आदेशाची वाट न बघता तातडीने पाचोरा व भडगाव तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा व सरसकट पंचनामे करून राष्ट्रीय सहायता निधी व राज्याच्या मदत निधीतून व शासनाचा अन्य तरतुदीमधुन शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी एकरी 50 हजार रुपये सानुग्रह अनुदान द्यावे तसेच पिक विमा कंपन्यांना शेतकऱ्यांच्या क्लेम प्रमाणे तातडीने पंचनामे करून दिवाळीपूर्वी रक्कम जमा करण्यात यावे, अशी मागणीचे निवेदन शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने उपविभागीय अधिकारी डॉ.विक्रम बांदल यांना देण्यात आले.

jalgaon 2022 10 19T175651.496

यावेळी शिवसेना नेत्या वैशाली नरेंद्रसिंग सुर्यवंशी, जिल्हाप्रमुख दिपकसिंग राजपूत, शेतकरी सेनेचे अरूण पाटील, रमेश बाफना, तालुका प्रमुख शरद पाटील, नगरसेवक दादाभाऊ चौधरी, दत्तात्रय जडे यांच्या सह पदाधिकारी उपस्थितीत होते.

---Advertisement---

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---