Thursday, May 26, 2022
Jalgaon Live News
Download App
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • रावेर
    • यावल
    • चोपडा
    • भडगाव
    • जामनेर
    • पारोळा
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • बोदवड
    • अमळनेर
    • मुक्ताईनगर
  • राजकारण
  • प्रशासन
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
    • जिल्हा परिषद
  • कोरोना
  • गुन्हे
  • नोकरी संधी
  • सामाजिक
  • सरकारी योजना
  • वाणिज्य
No Result
View All Result
Jalgaon Live News
No Result
View All Result
Jalgaon Live News
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • प्रशासन
  • कोरोना
  • गुन्हे
  • नोकरी संधी
  • सामाजिक
  • सरकारी योजना
  • वाणिज्य

लेखी आश्वासनानंतर महिला बचत गटांचे कर्ज माफीचे आंदोलन स्थगित

andolan mahila gat
चेतन पाटीलbyचेतन पाटील
December 13, 2021 | 5:34 pm

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ डिसेंबर २०२१ । संपूर्ण महाराष्ट्रातील मायक्रो फायनान्स महिला बचत गटांचे मार्च 2020 पर्यंतचे संपूर्ण कर्ज केंद्र सरकारने माफ करावे, या मागणीसाठी दि पीपल्स फाउंडेशनच्या अध्यक्षा गायत्री विश्वनाथ सोनवणे व त्यांच्या समस्त सहकारी महिला यांच्या नेतृत्वाखाली बचत गट कर्ज धारक महिला 12 ऑक्टोबर 2021 पासुन 13 डिसेंबर 2021 पर्यंत सुमारे 63 दिवसांपासुन जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव समोर धरणे आंदोलनाला बसलेल्या होत्या.

विविध पक्ष, संघटना व समाजसेवक यांनी सदर आंदोलनास भेट दिली व पाठिंबा जाहीर केला. दरम्यानच्या काळात खासदार उन्मेष पाटिल, खासदार रक्षाताई खडसे, आमदार सुरेश भोळे, जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनीही आंदोलकांशी चर्चा केली व आंदोलन स्थगित करण्यासाठी विनंती केली होती. परंतु याविषयी केंद्र सरकारचे प्रतिनिधी म्हणून खासदार उन्मेष पाटील यांच्याकडून लेखी आश्वासन मिळत नसल्याने आंदोलकांनी आजपर्यंत आंदोलन सुरूच ठेवले.

मागील तीन – चार दिवसांपासून खासदार उन्मेष पाटिल यांनी आंदोलक महिलांशी फोनवर चर्चा करून, सदर मागणी अधिवेशनात मांडुन व केंद्र सरकारच्या माध्यमातुन किंवा संबंधित यंत्रणेकडे पाठपुरावा करण्याविषयी लेखी आश्वासन पत्र दिले. सदर पत्र आमदार सुरेश भोळे व जिल्हाधिकारी यांचे प्रतिनिधी विलास हरणे यांच्या हस्ते आंदोलन स्थळी आंदोलांकर्त्या श्रीमती गायत्री विश्वनाथ सोनवणे व त्यांच्या समस्त महिला सहकारी यांना देण्यात आले.

या लेखी आश्वासनावर विश्वास ठेवत धरणे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे. यावेळी छावा मराठा युवा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अमोल कोल्हे, कांग्रेस पक्षाचे अल्पसंख्याक जिल्हाअध्यक्ष अमजद पठाण, जननायक फाऊंडेशनचे फिरोज पिंजारी , शिवसेना महानगर जिल्हा उपाध्यक्ष फरीद खान, लोकशक्ती फाउंडेशनचे अध्यक्ष पराग कोचुरे , धर्मरथ फाऊंडेशनचे विनायक पाटिल , मुस्लिम सेवा संघाचे महिला जिल्हाध्यक्ष फिरोजा शेख, विनोद अढाळके, छाया जाधव, आयेशा मणियार, चारुलता सोनवणे, दिपीका भामरे , धारा ठाकर आदि उपस्थित होते. सदर मागणीला योग्य न्याय न मिळाल्यास पुन्हा तीव्र स्वरूपात आंदोलन उभारण्यात येईल असे श्रीमती गायत्री विश्वनाथ सोनवणे व सहकारी महिला आंदोलांकर्त्या कळवले आहे.

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्राम । फेसबुक । ट्विटर । इंस्टग्राम ।युट्युब। गुगल न्यूज

in जळगाव शहर
SendShareTweet
चेतन पाटील

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

deokar-advt

grf ad 100x100 mm pdf

 

Next Post
5 protein rich vegetables

'या' आहेत प्रोटीन युक्त 5 आश्चर्यकारक भाज्या

Maharshi Vyas wins Koli Cricket League

कोळी क्रिकेट लिग स्पर्धेत महर्षी व्यास संघाचा विजय

sbi

SBI Bharti : स्टेट बँकमध्ये 1226 पदांसाठी भरती, पदवीधर उत्तीर्णांना नोकरीची संधी

© 2017 Powered by ContentOcean Infotech Private Limited.

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • रावेर
    • यावल
    • चोपडा
    • भडगाव
    • जामनेर
    • पारोळा
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • बोदवड
    • अमळनेर
    • मुक्ताईनगर
  • राजकारण
  • प्रशासन
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
    • जिल्हा परिषद
  • कोरोना
  • गुन्हे
  • नोकरी संधी
  • सामाजिक
  • सरकारी योजना
  • वाणिज्य

© 2017 Powered by ContentOcean Infotech Private Limited.