⁠ 
रविवार, डिसेंबर 22, 2024
Home | जळगाव जिल्हा | पाचोरा | पाचोर्‍यात आगळ्यावेगळ्या रूपांत घडणार ‘श्री’ गणेशाचे दर्शन

पाचोर्‍यात आगळ्यावेगळ्या रूपांत घडणार ‘श्री’ गणेशाचे दर्शन

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २ सप्टेंबर २०२२ । पाचोरा येथे भाजपचे तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांच्या संकल्पनेतून विविध पद्धतीत व आगळ्यावेगळ्या रूपांत पर्यावरण पूरक अशा श्री गणेशाच्या प्रतिकृती साकारल्या आहेत. सालाबादाप्रमाणे यावर्षी देखील अमोल शिंदे यांनी एक अनोख्या पद्धतीने श्री गणेशाची विविध वस्तूंच्या माध्यमातून अनेक स्वरूपाच्या प्रतिकृती तयार केल्या असून आगळ्यावेगळ्या रूपांतील श्री गणेशाच्या प्रतिकृतीचे तालुक्यातील नागरिकांनी सहपरिवार भेट देऊन दर्शन घ्यावे असे आवाहन करण्यात आले आहे.

पणतींचा गणेशा
मातीच्या २५०७५ पणत्यांच्या श्री गणेशाची प्रतिकृती उभारली गेली आहे. या प्रतिकृतीचा आकार ३० फूट लांब व २० फूट रुंद असून ही प्रतिकृती साकारण्याकरिता लागलेला कालावधी सलग ३० तास, साकारण्याकरिता मेहनत घेणारे मुख्य कलाकार ६ व सहकलाकार १७ असे एकूण २२ कलाकारांनी मेहनत घेऊन ही प्रतिकृती साकारलेली आहे.

पुशपिनचा श्रीगणेशा
कार्यालयीन स्टेशनरीत वापरली जाणारी पुशपिन पासून तयार केलेल्या या प्रतिकृतीमध्ये एकूण ८५००० पुशपिन वापरून ही प्रतिकृती साकारण्यात आलेली आहे.या प्रतिकृतीचा आकार लांबी ८ फूट व रुंदी ८ फूट असून ही प्रतिकृती साकारण्या करता सलग ७५ तासांचा लागलेला कालावधी लागला आहे. ही प्रतिकृती साकारण्यासाठी मुख्य कलाकार ०६ व सह कलाकार १७ अशा एकूण २३ कलाकारांनी ही प्रतिकृती साकारलेली आहे.

कापडांचा हँगिंग इन्स्टॉलेशन पासून श्रीगणेशा
जुने कपडे जमा करून या कपड्यांपासून ही श्रीगणेशाची प्रतिकृती साकारण्यात आलेली आहे.

अशा विविध स्वरूपांत साकारलेल्या श्री गणेशाचे दर्शन होणार असून या कलाकारांनी साकारलेल्या या कलेचा नागरिकांना आनंद घेता येणार आहे. यासाठी दिवस-रात्र मेहनत घेणारे मुख्य कलाकार चेतन राऊत,निरंजन भास्कर शेलार,राहुल चिंतामण पाटील जितेंद्र काळे,सुबोध कांतायन संदीप पाटील यांच्यासह सह कलाकार दर्शन सोनवणे, लौकिक अग्रवाल, विशाल सोनवणे, अक्षय पाटील, रितेश वाघ, निशांत पाटील, संकेत पाटील, ओम कानडे, सिद्धार्थ जाधव, रोहित भोई, पवन पाटील, दीपक हटकर, रामेश्वर मोरे, रुपेश सोनार, हर्षल हटकर, पवन पवा,र हर्षल कोळी, संदीप लोहार, गौरव पवार, शुभम पाटील, गौरव सोनवणे, अमोल लाथ, मनोज मालचे, रवींद्र राठोड, वसीम उस्मान, सुशील खेडकर, सिद्धार्थ पवार यांनी प्रामुख्याने योगदान दिले आहे.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह