⁠ 
बुधवार, एप्रिल 24, 2024

मुक्ताईनगरातील केळीसह मका, कांदा उत्पादकांना वादळासह गारपीटचा तडाखा

जळगाव लाईव्ह न्युज । सुभाष धाडे । हवामान खात्याकडून जळगाव जिल्ह्यासह राज्यातील विविध जिल्ह्यांना गारपिटीसह वादळी पावसाचा इशारा देण्यात आला होता. त्यानुसार जळगाव जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी गारपीट व मेघगर्जनेसह वादळी पावसाने झोडपून काढलं आहे. नैसर्गिक संकटाने मुक्ताईनगर तालुक्यातील अनेक वृक्ष कोसळले तर केळी उत्पादक शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार आलेल्या नैसर्गिक संकटाने तालुक्यातील दुई, सुकळी, डोलारखेडा, रामगड, पिंप्री आकाराऊत, कुंड, घोडसगाव आदी भागात वादळासह गारपीटीने झोडपले. आज दि २८ रोजी शुक्रवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास मेघगर्जनेसह वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली.आणि काही वेळात गारपीटीला सुरुवात झाली तब्बल वीस मिनिटे गारपीट झाली यामुळे तालुक्यातील अनेक वृक्ष कोसळले तर केळी उत्पादक शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले.

जळगावमध्ये भरदुपारी दाटला अंधार

सुकळी,दुई,डोलारखेडा,घोडसगाव, कुंड, पिंप्री आकाराऊत या पुर्णाकाठच्या केळीपट्ट्यात गार कोसळत राहीली. तालुक्यातील सातोड, तरोडा, रुईखेडा, ढोरमाळ, निमखेडी खुर्द आदी भागात गारपीटीमुळे कांदा व मका पीकांचे खुप मोठे नुकसान झाल्याचे कळते.सुमारे अर्धा तासापर्यतच्या चाललेल्या या गारपीटीमुळे शेतकरीवर्ग भयभयीत झाला.

ऐन कापणीवर आलेल्या हजारो हेक्टरवरील केळीबागांचे प्रचंड नुकसान झाले आहे.यामुळे केळी उत्पादक शेतकरी बांधवांवर दु:खाचा डोंगर कोसळला असुन परीसरातील अनेक शेतकऱ्यांना अश्रु अनावर झाले.
पुन्हा संध्याकाळी पावसाचे वातावरण निर्माण झाले असुन मेघगर्जना जोरदार सूरु आहे. यामुळे अवकाळीचे संकट घोंगावत आहे. प्रशासनाकडुन तात्काळ पंचनामे करुन लवकर नुकसान भरपाई मिळावी अशी अपेक्षा शेतकरी बांधवांकडुन होत आहे.

जळगावसाठी पुढचे 72 तास महत्वाचे.. वाचा नेमकं काय आहे