---Advertisement---
गुन्हे भडगाव

वाळूमाफियांची दादागिरी : तलाठ्याला मारहाण करून दगडाने मोबाइल ठेचला, दुचाकीही फोडली

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ डिसेंबर २०२१ । वाळूमाफियांची दादागिरी दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. तलाठ्यांवर होणारे हल्ले तर नेहमीचेच झाले आहे. भडगाव येथील कोळगाव रस्त्यावर अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर अडवल्यानंतर वाळूमाफियांनी थेट तलाठ्यास मारहाण केली. इतकच नव्हे तर त्यांचा मोबाइल दगडाने ठेचत दुचाकी देखील फोडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मारहाण केल्यानंतर ट्रॅक्टरसह तिघांनी पळ काढला आहे.

valu mafia sand

भडगाव तालुक्यातील शिंदी येथील तलाठी शिवाजी कौतिक पारधी (वय ५२) व त्यांचे सहकारी राजेंद्र थोरात हे दि.१९ रोजी तालुक्यातील कोळगाव रस्त्यावर अवैध वाळू वाहतुकीसंदर्भात कारवाई करण्यासाठी गेले होते. सकाळी सात वाजता त्यांनी अवैध वाळू वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर अडवले. समाधान युवराज पाटील व अजय रवींद्र मोरे (दोघे रा. वाक, ता. भडगाव) हे ट्रॅक्टरचालक पथकास आढळून आले. तलाठी पारधी यांनी दोन्ही चालकांना अडवून भडगाव तलाठी कार्यालयात ट्रॅक्टर जमा करण्याच्या सूचना केल्या.

---Advertisement---

ट्रॅक्टर पोलीस ठाण्यात जमा करण्यावरून दोघांमध्ये शाब्दिक चकमक सुरू झाली. हा वाद सुरू असतानाच ट्रॅक्टरमालक संजय सुरेश त्रिभुवन (रा.वाक, ता. भडगाव) हा तेथे आला. त्याने थेट पारधी यांच्यावर हल्ला चढवत छातीत बुक्के मारून जमिनीवर पाडले. यानंतर पारधींचा मोबाइल हिसकावून दगडाने ठेचला. तसेच थोरात यांच्या दुचाकीवर मोठे दगड मारून नुकसान केले. ट्रॅक्टरचालक व मालक यांनी प्रचंड मुजोरी दाखवत तलाठी पारधी यांना मारहाण करून मोबाइल, दुचाकीचे नुकसान केले. यानंतर तिघेजण वाळूचे ट्रॅक्टर घेऊन पळून गेले. या प्रकरणी तिघांविरुद्ध भडगाव पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. घटनेमुळे तलाठी प्रचंड घाबरले असून वाळूमाफियांना आवर कोण घालणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.

हे देखील वाचा :

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---