बुधवार, नोव्हेंबर 29, 2023

‘बिपरजॉय’ चक्रीवादळाचा महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांना बसणार फटका : हवामान खात्याकडून अलर्ट जारी..

जळगाव लाईव्ह न्यूज । 10 जून 2023 । ‘बिपरजॉय’ चक्रीवादळ पुढील 24 तासांत आणखी तीव्र होण्याची शक्यता असून याचा फटका महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना फटका बसणार असल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

चक्रीवादळाच्या प्रभामुळे राज्यातील कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. तर दुसरीकडे राज्यातील काही भागात तापमान वाढण्याचा देखील अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.
चक्रीवादळाच्या प्रभावामुळे कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा आणि केरळच्या समुद्रकिनारी भागात जोरदार वारे वाहण्याची शक्यता असून, हवामान विभागाकडून मच्छिमारांना इशारा देण्यात आला आहे.

दरम्यान, गेल्या दोन ते तीन दिवसांपासून महाराष्ट्रातील कमाल आणि किमान तापमानात मोठी वाढ झाली आहे. शुक्रवारी वाढलेल्या‎ तापमानामुळे नागरीकांना त्रास सहन‎ करावा लागत आहेत. नाशिक, सांगली,‎ छत्रपती संभाजीनगर, बुलडाणा,‎ सातारा, कोल्हापूर, पुण्याचे तापमान‎ चाळीशीच्या आत गेले. दुसरीकडे जळगाव जिल्ह्यातील तापमान 40 अंशाच्या वर गेले आहे.

यामुळे सध्या उष्णतेमुळे जळगावकर हैराण झाला असून यातून कधी दिलासा मिळेल याची प्रतीक्षा करतोय. दरम्यान, केरळमध्ये दाखल झालेल्या मान्सूनच्या पुढील प्रवास वेगाने सुरु असून तो लवकरच महाराष्ट्रात दाखल होणार आहे.