सायकलपटू विजय फिरकेंचा 1200 किमी सायकलिंग स्पर्धेत सहभाग

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ फेब्रुवारी २०२२ । भुसावळ स्पोर्ट्स अ‍ॅण्ड रनर्स असोसिएशनचे सायकलपटू विजय फिरके यांनी 1200 किमी बीआरएम स्पर्धेत यशस्वी सहभाग नोंदविला. बडोदा सायकलिस्ट क्लबतर्फे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. 26, 27, 28, 29 जानेवारी असे सलग चार दिवस सायकल चालवून 86 तासात त्यांनी ही कामगिरी पूर्ण केली. (jalgaon cycleing club)

या चार दिवसात त्यांनी प्रत्येक रात्री केवळ दोन तास आराम केला. बडोदा ते सातारा व पुन्हा परत सातारा ते बडोदा असे 1200 किमीचे अंतर होते. या दरम्यान त्यांनी खंडाळा, लोणावळा, कामशेत घाट, कात्रज घाट, घोडबंदर घाट, खंबाटकी घाट आदी वेगवेगळ्या घाटातून दिवस रात्र सायकलने प्रवास केला. या स्पर्धेत 21 सायकलपटू सहभागी झाले होते. त्यापैकी केवळ 19 सायकलपटूंना ही कामगिरी शक्य झाली. यशस्वी सायकलपटूंमध्ये 3 महिलांचा देखील सहभाग आहे.(vijay farke cycle jalgaon)

सत्कार प्रसंगी यांची होती उपस्थिती
गुरुवारी बडोद्याहून भुसावळला परतल्यानंतर सकाळी भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशनतर्फे त्यांचा संजय भदाणे व सारंग चौधरी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रसंगी विजय फिरके यांचे सर्व धावपटूंतर्फे अभिनंदन करण्यात आले. याप्रसंगी महिला धावपटू डॉ.चारुलता पाटील, स्वाती फालक, वर्षा वाढिले, मंजू शुक्ला, माया पवार, मोनिका देशमुख, भारती चव्हाण, स्वाती भोळे, दीपा स्वामी, विजया पाटील, चारुलता अजय पाटील, निलंबरी शिंदे, ममता ठाकूर, अर्चना चौधरी यांच्या सोबतच पुरुष धावपटू मोठ्या संख्येने उपस्थित होते.