शनिवार, डिसेंबर 2, 2023

Jalgaon : हद्दपारीच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या गुन्हेगाराला शस्त्रासह घेतलं ताब्यात

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ जुलै २०२३ । गुन्हेगारी प्रकरणात दोन वर्षांसाठी जिल्हा हद्दपार करण्यात आलेल्या संशयित गुन्हेगाराला शस्त्रासह पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. विशाल मुरलीधर दाभाडे (वय-२२) असं आरोपीचे नाव असून त्याला त्याच्या घरातून पोलिसांनी अटक केली.याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विशाल दाभाडे हा शहरातील रामेश्वर कॉलनी मधील रहिवाशी असून त्याच्याविरुद्ध जिल्हाधिकारी यांनी फेब्रुवारी २०२३ मध्ये दोन वर्षांसाठी हद्दपारीचे आदेश काढले होते. तरी देखील विशाल दाभाडे हा हद्दपारीच्या आदेशाचे उल्लंघन करून रामेश्वर कॉलनीत आलेला असल्याचे पोलीसांना समजले. दरम्यान १७ जुलै रोजी मध्यरात्री एमआयडीसी पोलीसांनी कोंबिंग ऑपरेशन राबविले.

पोलीसांनी केलेल्या कारवाई हद्दपार असलेला आरोपी विशाल दाभाडे याला पोलीसांनी अटक केली. त्यांच्याकडून लोखंडी सुरा हस्तगत केला आहे. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल सतिष गर्जे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक सुनिल सोनार करीत आहे.