⁠ 
शुक्रवार, एप्रिल 26, 2024

अवैध मांस विक्री करणाऱ्या चौघांविरोधात गुन्हा

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ फेब्रुवारी २०२२ । चाळीसगाव शहरात कत्तलीसाठी शेडमध्ये निर्दयीपणे बांधून ठेवलेल्या १५ जनावरांची येथील पोलिसांनी शुक्रवारी सुटका केली. तसेच बेकायदा विक्रीसाठी असलेले ६२० किलो मांस ही जप्त केेले. याप्रकरणी चौघांविरोधात येथील शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

शहरातील हुडको कॉलनी भागातील मदिना मशिदी जवळील कुरेशी मोहल्ल्यात ही बेकायदा मांस विक्री सुरू हाेती. पोलिस निरीक्षक के.के.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलिसांनी शुक्रवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास छापा टाकून ही कारवाई केल्यानेे खळबळ उडाली आहे. दरम्यान, हुडको कॉलनीतील कुरेशी मोहल्ल्यात एका कंपाउंडमध्ये तीन वेगवेगळ्या पत्र्याच्या शेडमध्ये कत्तलीसाठी मोठ्या प्रमाणावर जनावरे निर्दयीपणे बांधून ठेवले असून गोवंश व जनावरांचे मांस विक्रीसाठी बाळगले असल्याची माहीती चाळीसगाव शहर पोलिसांना मिळाली हाेती. पोलिसांनी ४ रोजी सकाळी ८ वाजता छापा टाकून ६२० किलो गोमांस जप्त केेले. तसेच कत्तलीसाठी शेडमध्ये ठेवलेले सुमारे १५ जनावरांची सुटका केली. येथे कत्तलीसाठी वापरले जाणारे साहित्य असा सुमारे २ लाख १ हजारांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे. याप्रकरणी हवालदार पंकज पाटील यांच्या तक्रारीवरून संशयित इफ्तेकारखान अहमदखान (रा. इस्लामपुरा, नवागाव), व चाळीसगाव येथील शेख शरीफ शेख मंजुर, मुश्ताक इसा कुरेशी व निहाल उर्फ भय्या सलीम कुरेशी या चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे देखील वाचा :