जळगाव लाईव्ह न्यूज । २६ एप्रिल २०२४ । भुसावळ, जळगावमधील प्रवाशांसाठी आणखी एक आनंदाची बातमी आहे. उन्हाळी सुट्यांमध्ये होणारी प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेता दक्षिण पूर्व मध्य रेल्वेने पुरी-उधना-पुरी द्विसाप्ताहिक उन्हाळी विशेष एक्स्प्रेस सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. २५ एप्रिल ते २८ जून या कालावधीत ही गाडी धावणार असून आठवड्यातून दोन दिवस धावणाऱ्या या विशेष एक्स्प्रेसच्या अप व डाऊन मार्गावर प्रत्येकी १७ अशा एकूण ३४ फेऱ्या होणार आहे. विशेष भुसावळसह जळगाव स्थानकावर थांबा असल्याने जळगावकर प्रवाशांची सोय झाली आहे.
दक्षिण पूर्व मध्य रेल्वेने जारी केलेल्या पत्रकानुसार, गाडी क्र. ०८४७१ पुरी-उधना विशेष एक्स्प्रेस २५ एप्रिल ते २७ जून या कालावधीत दर सोमवार व गुरुवारी पुरी स्थानकावरून सकाळी ६:३० वाजता रवाना होऊन दुसऱ्या दिवशी १४:०० वाजता उधना स्थानकावर पोहोचणार आहे. ही गाडी मंगळवार व शुक्रवारी सकाळी ६:१३ वाजता अकोला स्थानकावर येणार आहे.
परतीच्या प्रवासात ०८४७२ उधना-पुरी विशेष एक्स्प्रेस २६ एप्रिल ते २८ जून या कालावधीत दर मंगळवार व शुक्रवारी उधना स्थानकावरून सायंकाळी १७:०० वाजता रवाना होऊन दुसऱ्या दिवशी रात्री २२:४५ वाजता पुरी स्थानकावर पोहोचणार आहे. ही गाडी त्याच रात्री ००:५० वाजता अकोला स्थानकावर येणार आहे.
या ठिकाणी थांबा
अप व डाऊन मार्गावरील या विशेष एक्स्प्रेसला महाराष्ट्रात गोंदिया, नागपूर, वर्धा, बडनेरा, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, जळगाव, पाळधी, अमळनेर, नंदुरबार या स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे.