वरणगावात महिलेस मारहाण केल्याप्रकरणी आठ जणांविरोधात गुन्हा
जळगाव लाईव्ह न्यूज । ३ जानेवारी २०२२ । वरणगाव फॅक्टरीजवळ असलेल्या सुशील नगरात राहणाऱ्या महिलेस मारहाण करून जखमी केल्याचा प्रकार २९ डिसेंबर रोजी घडला. या प्रकरणी महिलेच्या फिर्यादीवरून दर्यापूर शिवारातील आठ जणांविरुद्ध येथील पोलिसां गुन्हा दाखल झाला आहे.
सुशील नगर परिसरात २९ डिसेंबर रोजी अरुण पगारे शेकोटीजवळ बसले होते. त्यावेळी शेजारी राहणाऱ्या विश्रांतीबाई इंगळे यांना दारू पिणारे लोक आमच्या घरासमोर लघुशंका करतात, असे म्हटले असता इंगळे यांनी पगारेंशी वाद करून शिवीगाळ केली. यावेळी त्यांच्या पत्नी पद्माबाई पगारे तेथे आल्या असता विश्रांतीबाई इंगळे, संजय इंगळे, साधना इंगळे यांनी जयेश साबळे, राजेश साबळे, अनिल साबळे, दीपक दोडे, रोशनी दोडे यांना बोलावले. या सर्वांनी लाकडी दंडुक्याने पद्माबाईस मारहाण केली. त्यात पद्माबाई गंभीर जखमी झाल्या. तसेच त्यांची मुलगी रत्ना पगारे तेथे आली असता तिलाही मारहाण, शिवीगाळ करण्यात आली. जखमींवर येथील ग्रामीण रुग्णालय व जळगावच्या सामान्य रुग्णालयात उपचार करण्यात आले.
या प्रकरणी पद्माबाई पगारे यांच्या फिर्यादीवरून वरणगाव पोलिस ठाण्यात आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. तपास एपीआय आशिष कुमार आडसूळ करत आहेत.
हे देखील वाचा :
- Pachora : वाळू माफियांकडून महसूल पथकातील कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की, चौघांना अटक
- धक्कादायक ! अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, रुग्णालयात दाखल
- मुंबई-नाशिक महामार्गावरील भीषण अपघातात अमळनेरच्या दाम्पत्याचा मृत्यू
- सावद्यात लाखो रुपयांचा अवैध गुटखा जप्त; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
- जळगावात मांजा विक्रीसह वापर करणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई; ८ जण ताब्यात