जळगावच्या क्रिकेटवीरांनी महाराष्ट्रात वाजवला डंका

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ नोव्हेंबर २०२२ । महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने परभणी येथील प्रियदर्शिनी इंदिरा गांधी स्टेडियम येथे सुरू असलेल्या १४ वर्षाआतील राज्यस्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत जळगाव संघाने सुरुवातीला दोन्ही नाशिक व लातूरला नमवून जोरदार आगेकूच केली आहे. (Jalgaon cricket)

स्पर्धेत राज्यभरातील ३२ जिल्हा संघांनी सहभाग घेतला आहे. जळगाव संघाने प्रथम सामन्यात नाशिक संघाला ३३ धावांनी पराभूत केले. या सामन्यात गणेश ठाकूर याने तीन गडी बाद केले. ठाकूरला सामनावीराचा सन्मान देण्यात आला. दुसऱ्या सामन्यात जळगावने लातूरला ३१ धावांनी पराभूत केले. पीयूष चव्हाणला सामनावीर मान देण्यात आला. पीयूषने एक गडी बाद करत फलंदाजी करताना ३० धावा केल्या. प्रशिक्षक म्हणून कुलदीप सपकाळे तर व्यवस्थापक म्हणून अबुजर पटेल आहेत.

जळगाव संघ असा :

दहेश कोल्हे (कर्णधार), आर्यन पाटील (यष्टीरक्षक) रणजीत धांडे, निहार पाटील, विनायक चौधरी, चिन्मय चौधरी, मेध मस्के, हितेश धांडे, यगनेश ठाकूर, अद्वेत हुद्दार, कुणाल पाटील, हिमांशू पाटील, प्रेमसिंग जाधव, कपिल बदे, पीयूष चव्हाण, हर्ष खडसे, आदित्य देव.