⁠ 
गुरूवार, एप्रिल 25, 2024

मनपा विशेष : कोण होणार मनपा शहर अभियंता ? लॉबींग सुरु

जळगाव लाईव्ह न्युज | मनपा विशेष | महापालिकेतील ४२ कर्मचारी ३१ मे रोजी सेवानिवृत्त होणार असून, यामध्ये शहर अभियंता विलास सोनवणी यांचा मुख्य समावेश आहे. यामुळे आता नवीन शहर अभियंता कोण ? असा प्रश्न सर्वानाच पडला आहे. यासाठी मनपा मध्ये लॉबींग सुरु झाली आहे.

महापालिकेतील महत्वाचे पद असलेल्या शहर अभियंता या पदासाठी प्रत्येक पक्षासह पदाधिकाऱ्यांकडून देखील आपल्या संपर्कातील अधिकाऱ्यांना महत्वाचे पद देण्यासाठी मोर्चेबांधणी म्हणजेच लॉबीग सुरु आहे. शहर अभियंतापदासाठी चंद्रकांत सोनगिरे, संजय नेमाडे व शकील शेख यांचे नाव आघाडीवर आहे.

तर दुसरीकडे पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख गोपाल लुल्हे व महापालिका अतिक्रमण निर्मुलन विभागाचे अधीक्षक ईस्माईल शेख हे देखील सेवानिवृत्त होणार आहेत. यासाठी पाणी पुरवठा विभागासाठी संजय नेवे व संजय पाटील यांचे नाव चर्चेत आहे. यासह अतिक्रमण निर्मुलन विभागाच्या अधीक्षकपदासाठी कोणत्याही कर्मचाऱ्याची नियुक्ती केली जाणार नसून, उपायुक्तांकडेच या विभागाचा कार्यभार राहणार आहे.

यामुळे आता शहराचा विकास करण्यासाठी नवीन मनपा शहर अभियंता कोण होत ? हे पाहणं अतिशय महत्वाचं असणार आहे. मात्र कोणीही अभियंता झालं तरी जळगाव शहराचा विकास होईल असाच अधिकारी जळगाव शहराला हवा आहे.