दिलासा : कोरोना पॉझिटिव्ह रुग्णसंख्या पुन्हा निम्यावर, वाचा आजची आकडेवारी

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । १० जानेवारी २०२१ । जळगाव जिल्ह्यात गेल्या चार दिवसापासून नव्या कोरोना बाधितांमध्ये मोठी वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. आज जिल्ह्यात ८० नवे बाधित रुग्ण आढळून आले आहे. तर एक रुग्ण बरा होऊन घरी परतला आहे. दिलासादायक बाब अशी की, आज देखील एकही रुग्णाचा मृत्यू झालेला नसल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी प्रसिध्दीपत्रान्वये दिली आहे. आज सर्वाधिक रुग्ण चोपडा व भुसावळमध्ये आढळून आली.

राज्यात सध्या कोरोनाने थैमान घातले आहे. गेल्या काही महिन्यापासून राज्यासह जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या आटोक्यात होती, मात्र, कोरोनाच्या नव्या विषाणूमुळे कोरोनाची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. काल रविवारी जिल्ह्यात कोरोनाचे १७९ रुग्ण आढळून आले आहे. तर आज ८० रुग्ण आढळून आले आहे.

यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत एकुण १ लाख ४३ हजार ३८६ बाधित रूग्ण (Corona Positive) आढळून आले आहे. त्यापैकी १ लाख ४० हजार २५५ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. जिल्ह्यात सध्या ५५२ रुग्ण उपचार घेत आहे. तर २ हजार ५७९ रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

आजच्‍या बाधितांमध्‍ये जळगाव शहरात १३, जळगाव ग्रामीण ४, भुसावळ २५, अमळनेर २, चोपडा २५, यावल १, जामनेर १, रावेर ४, मुक्ताईनगर ४ तर इतर जिल्ह्यात एक असे एकूण ८० नवे बाधित आज आढळून आले.

हे देखील वाचा :

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -