⁠ 
सोमवार, मे 27, 2024

.. तरच मिळेल ‘तिकीट’ ; जळगाव बैठकीत भाजप प्रदेशाध्यक्षांचा इच्छुकांना इशारा

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ मे २०२४ । लोकसभेची निवडणूक आटोपल्यावर काही दिवसांतच जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका, नगरपालिकांच्या निवडणुका अपेक्षित आहेत. त्या निवडणुकांमध्ये उमेदवारी हवी असेल, तर लोकसभा निवडणुकीत चांगला ‘परफॉर्मन्स’ दाखवावा लागेल, असा अप्रत्यक्ष इशाराच भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी इच्छुकांना दिला आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जळगावात पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी बावनकुळे म्हणाले, की लोकसभा निवडणुकीत ज्यांचा परफॉर्मन्स’ चांगला दिसेल, त्यांच्या विरोधात कोणीही निवडणुकीत उभे राहण्याची हिंमत करणार नाही. तुमच्या कार्यक्षेत्रात चांगले मताधिक्य मिळाले, तर तुमच्या प्रभागात, तुमच्या गटात वा गणात विरोधकांना उमेदवारही सापडणार नाही; परंतु मताधिक्य कमी झाल्यास विरोधक ताकदीनिशी उभे राहतील. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत परफॉर्मन्स’ दाखविणे आवश्यक आहे