जळगाव लाईव्ह न्यूज । १६ मे २०२२ । महिनाभरात जिल्ह्यातील ७७ प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत गावांमधील जलस्त्रोतांचे नमुने घेण्यात आले आहे. जिल्ह्याततील नांद खुर्द येथे दुषीत पाणी पुरवठा होत असल्याचे निदर्शनास आले. त्या गावाला रेड कार्ड देण्यात आले आहे. तर इतर ३६ गावांना येलो कार्ड देण्यात आले. त्यात सर्वाधिक ११ गावे धरणगाव तालुक्यातील आहेत. या गावांना यलो कार्ड देण्यात आले. तालुक्यातील ४ आरोग्य केंद्रापासून ही तपासणी करण्यात आली.
पावसाळ्यावेळी जिल्ह्यातील ग्रामीण भागात दुषीत पाणी पुरवठ्यामुळे संसर्गजन्य आजारांची लागण होते. यासाठी जि.प.च्या आरोग्य विभागाकडून प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या जलस्त्रोतांचे सर्वेक्षण करण्यात येते. त्याचा अहवाल प्राप्त झाला असुन जिल्ह्यात नांद खुर्द येथे दुषीत पाणी पुरवठा होत असुन त्या गावाला रेड कार्ड देण्यात आले आहे. तर येलो कार्डमध्ये ३६ गावांचा समावेश आहे. या गावांना देखील दुषीत पाणी पुरवठा होत आहे.
जि.पच्या आरोग्य केंद्रामार्फत आरोग्य कर्मचाऱ्यांना त्यांच्या अखत्यारीत गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या जलस्त्रोताचे नमुणे घ्यावे लागतात. त्या नमुन्यांची तपासणी प्रयोगशाळेत करण्यात येते. सदर पाणी पिण्या योग्य आहे की नाही याची तपासणी केली जाते. ज्या गावांचे स्त्रोत ७५ टक्के स्त्रोत दुषीत आहेत; अशा गावांच्या ग्रापंला ‘रेड कार्ड’ दिले जाते. तर हिरवेकार्ड असलेल्या गावांमध्ये ३५ टक्के खाली जलस्त्रोत दुषीत असल्यास त्याचा समावेश होतो. तर ३५ ते ७५ टक्के जलस्त्रोत दुषीत राहील्यास त्या गावांच्या ग्रा.पंला ‘यलो कार्ड’ दिले जाते.