⁠ 
शनिवार, एप्रिल 20, 2024

जळगाव जिल्ह्यात ‘रेमडेसिविर’ची अधिक दारात विक्री होत असल्यास ‘येथे’ करा तक्रार

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ एप्रिल २०२१ । रेमडेसिविर इंजेक्शनची काळ्याबाजारात विक्री करणाऱ्या टोळीवर पोलिसांनी नुकतीच कारवाई केली आहे. यानंतर जळगाव पोलीस दलाने रेमडेसिविरचा काळाबाजार करणाऱ्यांविरोधात कठोर भूमिका घेणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदे घेत याविषयी माहिती दिली आहे. सरकारी किमतीपेक्षा वाढीव दराने इंजेक्शनची विक्री करीत असतील तर नजीकच्या पोलिस ठाण्यात तक्रार द्यावी, असे आवाहन डॉ. मुंढे यांनी यावेळी केले आहे.

पोलिस अधीक्षक डॉ. मुंढे यांच्या ७२१९०९१७७३ या मोबाइल नंबरवर देखील नागरिक संपर्क साधू शकता. खूप आवश्यकता असल्यास रेमडेसिविर ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांत तक्रार करा, असे आवाहन देखील पोलिस अधीक्षकांनी केले आहे.