Friday, December 9, 2022

घनकचरा नदीत टाकला : नगरपरिषदेला 3 कोटी 90 लाखांची भरपाई

जळगाव लाईव्ह न्यूज । ३ एप्रील २०२२ । यावल तालुक्यातील फैजपूर शहराचा घनकचरा फैजपुर नगरपरिषदेने धाडी नदीत टाकल्याची तक्रार येथील रहिवासी ललितकुमार चौधरी यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे केली होती. या तक्रारीची दखल घेत ‘प्रनिमं’चे उपप्रादेशिक अधिकारी अजय चव्हाण यांनी नगरपरिषदेला 3 कोटी 90 लाखांचा पर्यावरण भरपाई शुल्क बाबतचे पत्र दिले आहे. यामुळे संपूर्ण जळगाव जिल्ह्यातील नगरपालिकासह ग्रामीण भागात संबंधित अधिकारी कर्मचारी वर्गात मोठी खळबळ उडाली आहे.

- Advertisement -

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी अजय चव्हाण यांनी दि.23मार्च रोजी फैजपूर नगरपरिषद आणि ललितकुमार चौधरी यांना शुल्क बाबतचे पत्र दिले आहे. त्यात म्हटले आहे की, फैजपूर येथील गाडी नदीपात्रात प्लास्टिक मिश्रित फैजपुर शहराचा घनकचरा टाकल्या बाबतची तक्रार दि.23जुलै2021 रोजी मप्रनि मंडळाकडे प्राप्त झाली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने कार्यालयामार्फत पाहणी करण्यात आली असून सदर नगर परिषदे विरुद्ध सत्र दिवाणी न्यायालय यावल येथे दि. 12नोव्हेंबर 2021 रोजी खटला दाखल करण्यात आला आहे. त्यानुसार दि. 8नोव्हेंबर2021 रोजी 3 कोटी 90 लाख पर्यावरण भरपाई शुल्क बाबतचे पत्र फैजपूर नगर परिषदेला देण्यात आलेले आहे.

कार्यवाही सुरू

- Advertisement -

जळगाव जिल्ह्यात काही नगरपालिकांच्या आणि काही ग्रामपंचायतींच्या कार्यक्षेत्रात प्लास्टिक मिश्रित घनकचरा वाटेल ‘त्या’ जागेवर नदी नाल्यात सोयीनुसार टाकण्यात आला आहे, अशाच प्रकारची यावल नगर परिषदेची तक्रार जिल्हाधिकारी कार्यालय नगरपालिका शाखा प्रभारी सहाय्यक आयुक्त प्रशांत सरोदे यांच्याकडे तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ उपप्रादेशिक अधिकारी जळगाव यांच्याकडे दि.28 जानेवारी 2022 रोजी करण्यात आली आहे. अद्याप या तक्रारीची दखल फक्त कागदावर घेण्यात आली असून प्रत्यक्षात संबंधितांनी कोणतीही कृती केलेली नाही त्यामुळे यांना जबाबदार धरून पुढील कार्यवाही सुरू आहे.

- Advertisement -
[adinserter block="2"]