काेम्बिंग ऑपरेशन, ७ अटकेत तर ९ जणांना बजावले समन्स
जळगाव लाईव्ह न्यूज । २३ जानेवारी २०२२ । भुसावळ शहरात पोलिसांनी शुक्रवारी रात्री १० ते शनिवारी पहाटे ४ वाजेपर्यंत सहा तास विविध भागात कोम्बिंग ऑपरेशन राबवले. त्यात एक हद्दपार, तीन वाँटेड आणि तीन संशयित अशा एकूण ७ जणांना अटक केली. शिवाय ९ संशयितांना न्यायालयाचे अटक वॉरंट बजावण्यात आले.
डीवायएसपी साेमनाथ वाघचाैरे यांच्या मार्गदर्शनाखाली बाजारपेठ व शहर पाेलिस ठाण्याच्या हद्दीत स्वतंत्र पथक तयार करून ही कारवाई केली. त्यात स्वत: डीवायएसपी वाघचाैरे, शहर पाेलिस ठाण्याचे निरीक्षक गजानन पघडन, बाजारपेचे निरीक्षक राहूल गायकवाड, एपीआय हरीश भोये, महाजन, अंबादास पाथरवट यांचा सहभाग होता. कोम्बिंग ऑपरेशनमध्ये पोलिसांनी न्यायालयाने काढलेल्या अटक वारंटमधील संशयितांची तपासणी केली.
रेकाॅर्डवरील व पाहिजे असलेल्या १४ गुन्हेगारांची तपासणी केली. त्यापैकी ११ जण घरी, तर बाहेर असलेल्या तिघांचा शोध सुरू केला. दरम्यान, उपविभागातील पोलिसांना पाहिजे असलेल्या ३२ संशयितांपैकी अनिस खान सिकंदर खान (वय ४५), सज्जाद खान अनिस खान (वय १९), भुसावळ शहर पाेलिसांना हवा असलेला विष्णू परशुराम पथरोड या तिघांना अटक केली.
११ बेलेबल वॉरंट बजावले
न्यायालयात हजर न राहणाऱ्या संशयिताविरुद्ध बेलेबल वॉरंट काढले जाते. अशा ११ संशयितांना रात्रीच्या कोम्बिंग ऑपरेशनमध्ये वॉरंट बजावण्यात आले. याशिवाय हद्दपार केलेले काही संशयित रात्री शहरात येतात. ही माहिती मिळाल्याने पोलिसांनी हद्दपार असलेल्या १० जणांच्या घरी जावून तपासणी केली. त्यात शाकीर उर्फ गोलू शेख रशीद याला ताब्यात घेत महाराष्ट्र पोलिस कायदा कलम १४२ नुसार गुन्हा दाखल केला.
तीन संशयितांना अटक
रात्री गुन्हा करण्याच्या उद्देशाने संशयास्पद पणे फिरणाऱ्या तिघांची पोलिसांनी चाैकशी केली. त्यात उडवाउडवीची उत्तरे मिळाल्याने मजहरोद्दीन एजाजोद्दीन शेख (वय २९), जुबेर शहा कय्युब शहा (वय १९) व शाम तायडे (वय २२, सर्व रा भुसावळ) यांना अटक करण्यात आली. त्यांच्या विरुद्ध कलम १२२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
हे देखील वाचा :
- जळगावात मांजा विक्रीसह वापर करणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई; ८ जण ताब्यात
- Jalgaon : शेतीतून उत्पन्न नाही, कर्जफेडीची चिंता, घरात कोणी नसताना शेतकऱ्याने उचललं धक्कादायक पाऊल
- जळगावात नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्या दोन युवकांवर गुन्हा दाखल
- जळगावात चाकूचा धाक दाखवून वाइन शॉप चालकाला मागितली खंडणी; गुन्हा दाखल
- बसच्या धडकेत सैन्य दलातील जवान गंभीर जखमी; जळगाव शहरातील घटना