---Advertisement---
जळगाव जिल्हा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 4 मार्च रोजी जळगाव दौऱ्यावर ; असे आहे दौऱ्याचे नियोजन

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । 3 मार्च 2024 । राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सोमवार ४ मार्च रोजी जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या हस्ते मुक्ताईनगर तालुक्यातील तापी नदीवरील पुलाचे बांधकामाचे भूमीपुजन होणार आहे.

eknath shinde 1 jpg webp

असे आहे दौऱ्याचे नियोजन
सोमवार दि. 4 मार्च, 2024 रोजी सकाळी 10.30 वा. जळगाव विमानतळ येथे आगमन व हेलिकॉप्टरने पोलीस मुख्यालय हेलिपॅड, वाशिमकडे प्रयाण. दुपारी 3.55 वा. वाशिम येथून हेलिकॉप्टरने मौजे मुंढोळदे (खडकाचे) हेलिपॅड, ता.मुक्ताईनगर, जि.जळगाव येथे आगमन व मोटारीने कार्यक्रम स्थळाकडे प्रयाण. सायंकाळी 4.00 वा. मौजे मुंढाळदे (खडकाचे) ता. मुक्ताईनगर ते सुलवाडी ऐनपूर, ता. रावेर, जि.जळगाव या दोन तालुक्यांना जोडणाऱ्या तापी नदीवरील पुलाचे बांधकामाचे भूमीपुजन, (स्थळ- मौज मुंढोळदे (खडकाचे) ता.मुक्ताईनगर, जि.जळगाव) सायं. 4.45 वा. आमदार श्री. चंद्रकांत पाटील मुक्ताईनगर यांचे निवासस्थानी सदिच्छा भेट, सायं. 5.00 मौजे कोथळी ता. मुक्ताईनगर, जि.जळगाव येथे श्री. संत मुक्ताई मंदिर येथे दर्शन, सायं. 5.10 वा. मोटारीने मौज मुंढोळदे (खडकाचे) हेलिपॅड, ता. मुक्ताईनगर, जि.जळगावकडे प्रयाण, सायं. 5.15 वा. मौज मुंढोळदे (खडकाचे) हेलिपॅड, ता.मुक्ताईनगर, जि.जळगाव येथे आगमन व हेलिकॉप्टरने जळगावकडे प्रयाण. सायं. 5.40 वा. जळगाव विमानतळ येथे आगमन व मोटारीने खेडी जळगावकडे प्रयाण, सायं. 5.55 वा. खेडी जळगाव येथे आगमन व वारकरी भवनाचे भूमिपुजन सोहळा, सायं. 6.10 वा. मोटारीने जळगाव विमानतळाकडे प्रयाण. सायं. 6.20 वा. जळगाव विमानतळ येथे आगमन व शासकीय विमानाने मुंबई विमानतळाकडे प्रयाण.

---Advertisement---

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---