जळगाव लाईव्ह न्यूज । १० फेब्रुवारी २०२५ । लोकसभा , विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी नेते मंडळींनी कंबर कसली. याच पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात अनेक अटकली सुरू आहेत. यातच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या निवासस्थानी ‘शिवतीर्थ’वर भेट दिली. ही भेट राजकीय वर्तुळात खूप चर्चेत आणली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सकाळी राज ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. या भेटीच्या निमित्ताने राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या अटकली सुरू झाल्या आहेत. मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज ठाकरे यांच्या निवासस्थानी जाण्यापूर्वी महाराष्ट्र राज्य भारत स्काऊट अँड गाईड हॉलमधील शिवाजी पार्कमध्ये एका कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची तयारी होती, मात्र त्यापूर्वी त्यांनी राज ठाकरे यांच्या भेटीला प्राधान्य दिले.
भेटीचे कारण?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांना सांगितले की, “ही भेट कुठलीही राजकीय भेट नव्हती. मी मुख्यमंत्री झाल्यानंतर राज ठाकरे यांचा फोन आला होता. त्यांनी माझे अभिनंदन केले. अभिनंदनाचा फोन आल्यानंतर मी त्यांना सांगितले की, मी त्यांच्या घरी येईन. त्याप्रमाणे मी आज त्यांच्या निवासस्थानी गेलो होतो. आम्ही ब्रेकफास्ट केला आणि गप्पा मारल्या.” मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले की, “या भेटीचा कुठलाही राजकीय संदर्भ नाही. मैत्रीकरिता मी त्यांच्या घरी गेलो होतो.”
राजकीय अटकली
राज ठाकरे यांच्या पुत्र अमित ठाकरे यांना भाजप राज्यपाल कोट्यातून विधान परिषदेवर पाठवण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे, ही बाब राजकीय वर्तुळात खूप चर्चेत आहे. मात्र, मुख्यमंत्री फडणवीस यांनी या भेटीच्या राजकीय संदर्भाबद्दल कोणतीही माहिती दिली नाही.