⁠ 
बुधवार, एप्रिल 24, 2024

गावकऱ्यांनो ऐका हो : हतनूरचे सर्व दरवाजे उघडले

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ जुलै २०२२ । संपूर्ण जिल्ह्यात होत असलेल्या पावसामुळे हतनूर धरणाचे 41 पैकी 41 दरवाजे पूर्ण उंचीने उघडण्यात आले आहेत. यावेळी तापी नदीपात्रामध्ये सद्यस्थितीत १८६००० क्युसीयस इतका विसर्ग सुरू आहे. यामुळे नागरिकांनी सावधानी बाळगावी असे सांगण्यात आले आहे.

सखल भागात राहणाऱ्या नागरिकांनी तसेच नदी काठच्या नागरिकांनी तातडीने सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे. नाले, ओढे काठच्या नागरिकांनी दक्ष रहावे. नदीच्या पाणी पातळीत वाढ होत असल्यास नदीपात्रापासून दूर जावे. पुराचे पाणी पुलावरून वाहत असल्यास पूल ओलांडू नये. पूर पाहण्यासाठी गर्दी करू नये व सेल्फी काढण्याचा मोह टाळावा. पूरग्रस्त भागातून वाहने चालवू नये. जमिनीखालून जाणाऱ्या विद्युत तारेपासून सावध राहावे, असेही जळगाव जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.