दुर्दैवी घटना : चोपड्यात दोन वर्षीय चिमुकल्याचा पाण्याच्या हौदात बुडून मृत्यू

मे 4, 2021 6:35 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ०४ मे २०२१ । चोपडा शहरातील सुंदरगढी भागात दोन वर्षीय मुलगा खेळत असताना पाण्याच्या हौदात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना दि ३ रोजी सायंकाळी सुमारास घडली आहे.

chopda

शहरातील प्रताप विद्या मंदिर या शाळेतील शिक्षक भूषण देशमुख यांचा दोन वर्षांचा मुलगा कलश हा सुंदरगढी येथील राहत्या घरी खेळत असताना पाण्याच्या हौदात जाऊन पडला आणि काहीवेळाने नातेवाईकांनी कलशचा शोध घेतला असता कलश घराबाहेरील पाण्याच्या हौदात बुडालेला दिसून आला.

त्यानंतर नातेवाईकांनी उपचारासाठी कलशला शहरातील खाजगी रुग्णालयात दाखल केले परंतु दोन वर्षीय कलशला  डॉक्टरांनी मृत  घोषित केले.त्यानंतर त्याला उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आले.यावेळी कलशच्या आईवडिलांसह नातेवाईकांनी मोठा हंबरडा फोडला होता. या प्रकरणी चोपडा शहर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now