⁠ 
शुक्रवार, मार्च 29, 2024

मिरची कांडप कारखान्याला आग; लाखो रुपयांचे नुकसान

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ एप्रिल २०२२ । बोदवड शहरातील मलकापूर रोडवरील खंडेलवाल पेट्रोल पंपामागील देवराम कडू माळी यांच्या मिरची कांडप कारखान्याला शनिवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. त्यात लाखो रुपयांचे नुकसान झाले. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

अधिक माहिती अशी की, देवराम माळी यांचा कोरडी मिरची कांडप करून त्यापासून चटणी तयार करण्याचा कारखाना आहे. तेथे चार गावातील मिरची व्यापाऱ्यांसह कारखाना मालक आणि त्यांचे भाऊ शांताराम माळी यांची मिरची कांडपासाठी आणलेली होती. मात्र, देवराम माळी यांच्या मुलाला शनिवारी हळद लागल्याने कारखाना बंद होता. रात्री ८ वाजेच्या सुमारास त्यांच्या कारखान्याला अचानक आग लागली. या आगीत गॅस हंडीचा स्फोट झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. त्यामुळे आगीने काही रौद्र रुप धारण केले. हा प्रकार लक्षात येताच आजूबाजूच्या रहिवाशांनी टँकरद्वारे पाणी मारून आग विझवण्याचा प्रयत्न केला. तरीही उपयोग न झाल्याने जामनेर, भुसावळ, वरणगाव पालिकेचे अग्निशमन बंब बोलावण्यात आले. जेसीबीने कारखान्याचे लोखंडी शटर तोडून बंबाद्वारे आत पाण्याचा मारा करण्यात आला. तरीही रात्रभर आगीची धग जाणवत होती.

`