प्रेमाच्या आठवणी ताज्या करण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे गुवाहाटीला जाणार – आमदार खडसे
जळगाव लाईव्ह न्यूज । १६ नोव्हेंबर २०२२ । राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आमदार एकनाथ खडसे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर चांगलच तोंड सुख घेतलं आहे. यावेळी प्रेमाच्या आठवणी ताज्या करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या 40 आमदारांना घेऊन गुवाहाटीला जाणार आहेत असे खडसे म्हणाले. एक प्रकारे प्रेयसीच्या आठवणी ताज्या करण्याचाच हा प्रकार आहे, असेही खडसे म्हणाले.
मुक्ताईनगरमध्ये अंतुरली गावात सभेला संबोधित करताना एकनाथ खडसे यांनी ही टीका केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 40 आमदारांना घेऊन पुन्हा गुवाहाटीला जाणार आहेत. प्रेमाच्या आठवणी ताज्या करण्यासाठी शिंदे आपल्या 40 आमदारांना घेऊन गुवाहाटीला जाणार आहेत. प्रेमाची जशी आठवण असते तशी प्रेयसीसोबतचीही आठवण असते, असं सांगतानाच भेट तुझी माझी प्रेमाची. अजून त्या दिसाची. झुंजवाऱ्याची. रात्र पावसाची तशी, आपले शिंदे साहेब परत 40 आमदार घेऊन वाट धरताहेत गुवाहाटीची, अशी टीकाही एकनाथ खडसे यांनी केली.