मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरे यांच्यावर जबरी टीका

जळगाव लाइव्ह न्यूज । २७ मे २०२३ । हिंदुरुदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या दुसऱ्या टप्प्याचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर नाव न घेता जबरी टीका केली

eknath shinde udhav thakre jpg webp

दिलेला शब्द आम्ही पाळतो. दिलेला शब्द पाळायची आम्हाला सवय आहे. एकदा कमिटमेंट केली म्हणजे केली. मग त्या शब्दाला जागण हे आमचं कर्तव्य आहे. आणि ते आम्ही पार पाडत असतो. आम्ही जे करतो ते जाहीरपणे करतो. जाहीरपणे शब्द देतो. इतर लोकांप्रमाणे आम्ही घरात बसून चर्चा करत नाही. तर आम्ही खुली किताब आहोत. याचमुळे महत्त्वकांक्षी प्रकल्प पूर्ण होऊ शकतात असे एकनाथ शिंदे म्हणाले

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तिसरा टप्पा लवकरच पूर्ण होईल असेही आश्वासन दिले. एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर यावेळी निशाणही साधना. आम्ही घरात बसून काम करणार नाही. तर फील्डवर उतरून काम करणारे लोक आहोत. अशी टीका त्यांनी एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर केली.

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना माझ्याकडे काही काम नव्हतं तेव्हा फडणवीस यांनी मला समृद्धी महामार्ग पूर्ण करण्याचं काम दिलं आणि मी रस्त्यावर उतरून काम केलं.अनेक अडथळे आले. मात्र ते मी मार्गी लावले. शेतकऱ्यांना तीन तासांमध्ये आम्ही पैसे दिले. यामुळे लोकांचा विश्वास आमच्यावर वाढला. अशी माहिती यावेळी एकनाथ शिंदे यांनी दिली.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now