छत्रपती संभाजी मित्र मंडळाची कार्यकारणी घोषित अध्यक्षपदी रवींद्र वाणी
जळगाव लाईव्ह न्यूज । १३ ऑगस्ट २०२२ । सावदा येथील जुन्या व प्रतिष्ठित अश्या छत्रपती संभाजी मित्र मंडळाची सभा दि 13 रोजी संपन्न झाली. यावेळी अध्यक्षस्थानी येथील प्रतिष्ठीत व्यापारी अरविंद अकोले हे होते. मागील वर्षाचा आढावा घेण्यात आला तर नवीन वर्षात होणारे कार्यक्रम तसेच गणेशोत्सवाचे नियोजन देखील करण्यात आले. यावेळी मंडळाची नवीन कार्यकारणी घोषित करण्यात आली. यात अध्यक्षस्थानी सर्वानुमते रवींद्र वाणी यांचं तर उपाध्यक्षपदी संतोष विसपुते, सचिव पवन तांबटकर व खचिनदार शुभम चतुर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
याच वेळी स्वातंत्र्याचा 75 वा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्याचे ठरले यात दि 14 रोजी रात्री देशभक्तीपर गीते लावून आकर्षक रोषणाई व फटाक्यांची आतिषबाजी करण्यात येणार असून दि 15 रोजी भारतमाता पूजन, ध्वजारोहण, तसेच लहान बालकांना खाऊ वाटप व नागरिकांन साठी चहापान असे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे,
तर गणेशोत्सव कोरोना काळा नंतर दोन वर्षांनी साजरा होत असल्याने तो देखील मोठ्या प्रमाणात व विविध कार्यक्रमांनी साजरा करण्याचे ठरले यावेळी मंडळाचे आधारस्तंभ राजेश वानखेडे यांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले व फक्त गणेशोत्सव साजरा न करता वर्षभर समाजीपयोगी कार्यक्रम घ्यावे असे आपल्या मनोगतात सांगितले व तरुण मुलांनी या मंडळाचे माध्यमातून चांगले कार्य करावे असे देखील प्रतिपादन यावेळी केले, याबैठकीस मंडळाचे जेष्ठ सदस्य सुनील वाणी, सुनिल अकोले, मंगेश वाणी, सुनील चोपडे, नितीन खरे, सुनील बोडडे, हर्षल वानखेडे, दिपक श्रावगे, यांचे सह जेष्ठ तथा नवयुवक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते