
जळगाव लाईव्ह न्यूज । १३ जुलै २०२२ । भाजपचे राजकारण महाराष्ट्राला लागलेले कलंक आहे असे म्हणत देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, नितेश राणे, रवि राणा ,यांचा शिवसेनेना धरणगाव तालुक्याच्या वतीने फलक फाडण्यात आला.
आंदोलनाच्या वेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नितेश राणे, चंद्रशेखर बावनकुळे रवी राणा यांचे छायाचित्र असलेला फलक किन्नरांकडून फाडण्यात आला. जय भवानी जय शिवाजी अशा घोषणा देत शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारका जवळ किन्नर समाजाचा तर्फे जोडे मारून भाजपा नेत्यांच्या निषेध केला.
यावेळी उद्धव साहेब ठाकरे यांनी केलेले वक्तव्य योग्यच आहे. भाजपकडून होत असलेल्या राजकारणाने राज्याला कलंक लागला आहे. असे शिवसेना सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ म्हणाले. यावेळी उपस्थित भागवत चौधरी, राजेंद्र ठाकरे, जयदीप पाटील, विजय पाटील, नंदलाल पाटील, संतोष सोनवणे, लिलाधर पाटील, बापू महाजन, हेमंत महाजन,रवी जाधव,चेतन जाधव, परमेश्वर महाजन,भरत महाजन, सुनिल चव्हाण, प्रल्हाद पारधी, रणजित पुरभे, गणेश माळी,राहुल रोकडे,गजू महाजन,पिंटू महाजन, महेश चौधरी, गोपाल चौधरी,छोटू चौधरी,जिभाऊ पाटील, यांच्या सह असंख्य शिवसैनिक उपस्थित होते.