⁠ 
शुक्रवार, एप्रिल 19, 2024

जळगावच्या पर्यावरणप्रेमींची लडाख सफर, काश्मीरच्या जंगलात फेकल्या निंबाच्या बिया

जळगाव लाईव्ह न्यूज । विनोद कदम । झाला लावा, झाले जगवा हे वाक्य आपण अनेक ठिकाणी ऐकतो, वाचतो पंरतु केवळ दुसऱ्यालाच सांगणं, बरोबर नसत. त्यामुळे दुसऱ्यालाही जागृत करणं आणि स्वतःही जागृत होणं महत्वाचं असत. अमळनेर येथील पर्यावरण प्रेमींनी पर्यावरण दिनी जंगलात भटकंती करत विविध औषधी वनस्पती, झाडांच्या बिया जंगलात फेकून वैविध्यपूर्ण वनसंपदा जतन करण्याचा प्रयत्न केलाय. एवढेच नाहीतर काश्मीर, लेह, लडाख येथे पर्यटनाला गेल्यानंतरही खान्देशातील निंबाची झाडे तेथे जगावीत यासाठी त्यांनी तेथेही बिया फेकल्या आहेत.

पर्यावरण दिनाचे औचित्य साधून डॉ. जयवन्त पटवर्धन , शीतल देशमुख, शैलेश पाटील, उमेश वाल्हे, राजेश वाघ यांनी तालुक्यातील डांगर येथील जंगलात भटकंती करत वर्षभर गोळा केलेल्या चिंचोक्या, निंबोळ्या, चिकू बिया, आंब्याच्या कोयी, सीताफळ बिया, बकाम आदी बिया विविध ठिकाणी फेकल्या. पावसाळ्यात त्यातील काही झाडे जगून विविध प्रकारची वनसंपदा जंगलात जतन करण्याचा संकल्प केला आहे. प्रा. धर्माधिकारी यांच्या नेतृत्वाखाली निसर्ग प्रेमी मित्रमंडळ सोशल मिडीया ग्रुप स्थापन केला आहे. वर्षभरात हे मंडळ जंगलात भटकंती करून निसर्गाचा अभ्यास करून पर्यावरण संवर्धन साठी प्रयत्न करीत असतात. नुकतेच त्यांनी काश्मीर, लेह, लडाख आदी ठिकाणी पर्यावरण करताना खान्देशातील निंबाच्या झाडाच्या निंबोळ्या टाकून त्या भागात निंबाची झाडे जगवण्याचा प्रयोग केला आहे.