जळगाव जिल्हा

जळगावकरांनो..! कमी आवाजाचे फटाके फोडून आनंदात दिवाळी साजरा करा; जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ ऑक्टोबर २०२४ । दिवाळी हा सण सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. दिवाळीत सर्वत्र आनंदाचे वातावरण असते. सोमवारपासून म्हणजेच वसुबारसपासून दिवाळी सणाला सुरुवात झाली आहे. घरात गोडधोड पदार्थ बनवले जातात आहेत. तर बाहेर फटाके फोडले जात आहेत. मात्र फटाके फोडतांना आपल्यासोबतच इतरांची, प्राण्यांची काळजी घेण्याचे आवाहन जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांन केले आहे.

आवाहन करताना जिल्हाधिकारी म्हणाले की, दिवाळी साजरी करतांना आपण विषेश लक्ष द्या कि कुठल्याही प्राणी आणि पक्ष्यांना आपला त्रास किंवा इजा होणार नाही. कुठल्याही पक्ष्याला किंवा प्राण्याला त्रास झाला तर आपण 1962 या क्रमांकावर संपर्क करुन ब्यू ॲम्बुलन्स या फिरत्या दवाखान्याशी संपर्क साधावा. जर एखादी व्यक्ती त्या प्राण्याला त्रास देत असेल तर त्याच्याबद्दल ताबडतोब पोलिसांना सुचना देऊन त्याच्याबद्दल तक्रार नोंदवा.

दुसरी गोष्ट म्हणजे दिवाळी साजरी करताना फटाके फोडतांना आपण कुठल्याही प्रकारचे नायलॉन किंवा सिल्कचे कपडे परिधान करु नका. रॉकेट, बॉब्म सारखे फटाके फोडताना डोळ्यांची काळजी घ्यावी. अती आवाजाचे फटाके फोडू नका. कारण त्याचा आपल्या ऐकण्याच्या क्षमतेवर याचा परिणाम होऊ शकतो. असे त्यांनी सांगितले. या सर्व गोष्टीकडे लक्ष देत दिवाळी आनंदात साजरा करा असे आवाहन करत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button