---Advertisement---
राजकारण महाराष्ट्र

मोठी बातमी ! छगन भुजबळ आज मंत्रिपदाची शपथ घेणार, कोणते खाते मिळणार?

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २० मे २०२५ । बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार धनंजय मुंडे यांच्यावर अनेक गंभीर आरोप देखील करण्यात आले. या प्रकरणानंतर धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. त्यांच्या राजीनाम्यानंतर अन्न व नागरी पुरवठा खातं हे कुणाकडे जाणार याबाबत चर्चा होती. अखेर धनंजय मुंडे यांचं खातं अजित पवार गटाचे नेते आमदार छगन भुजबळ यांना देण्यात येणार आहे.

chhagan bhujbal

छगन भुजबळ आज मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. सकाळी १० वाजता राजभवन येथे त्यांचा शपथविधी कार्यक्रम पार पडणार आहे.मिळालेल्या माहितीनुसार, अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ आज मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. धनंजय मुंडे यांचं खातं छगन भुजबळ यांना दिलं जाणार आहे. धनंजय मुंडे यांच्याकडे अन्न व नागरी पुरवठा या खात्याची जबाबदारी होती.

---Advertisement---

आता हे खातं छगन भुजबळ यांच्याकडे देण्यात येणार आहे. महायुतीच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यामुळे छगन भुजबळ हे नाराज होते. पण आता त्यांना मंत्रिपद देऊन नाराजी दूर करण्याचा प्रयत्न महायुतीकडून करण्यात आला असल्याचे बोलले जात आहे.

छगन भुजबळ यांच्या शपथविधीचा कार्यक्रम आज सकाळी १० वाजता राजभवनामध्ये पार पडणार आहे. ५० व्यक्तींच्या उपस्थितीमध्ये हा शपथविधी कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमासाठी राजभवनामध्ये काल रात्रीच तयारी करण्यात आली. सर्वांना सकाळी ९ वाजेपर्यंत राजभवनात येण्याबाबतच्या सूचना देण्यात आल्या आहेत. छगन भुजबळ मंत्री होणार असल्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांना प्रचंड आनंद झाला आहे. ते मंत्री होणार असल्याचे वृत्त कळाताच त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---

Leave a Comment