रासायनिक खतांच्या किमती वाढल्या ; शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडले

डिसेंबर 9, 2025 2:29 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । शेतकऱ्यांचे आर्थिक गणित पुन्हा एकदा बिघडले आहे. रासायनिक खतांच्या किंमतीत १५ टक्क्यांनी वाढ झालीय. रब्बी हंगामाच्या पार्श्वभूमीवर खतांच्या पिशवीमागे २०० ते ३०० रुपयांपर्यंत वाढ झाल्याने शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला आहे.

subsidy on phosphate potash fertilizers

एकीकडे शेतीमालाला भाव मिळत नाहीय, त्यात खते व कीटकनाशकांच्या किमती दरवर्षी वाढत असल्याने शेतकरी मेटाकुटीस आले आहेत.आगामी हंगामाचे नियोजन करताना खर्च-उत्पन्नाचा ताळमेळ बसत नसल्याची व्यथा शेतकऱ्यांनी मांडली.

अलीकडच्या काळात उत्पादनवाढीसाठी रासायनिक खतांचा वापर अनिवार्य झाला आहे. मात्र, शासनाच्या दर धोरणामुळे खतांच्या किमती वर्षोनुवर्षे वाढत असल्याने शेतकऱ्यांवर आर्थिक भार वाढत चालला आहे.

अतिवृष्टी आणि अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे खरीप हंगामात मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीतून सावरण्यापूर्वीच रब्बी हंगामात खतांचे दर वाढल्यामुळे शेतकरी नव्या आर्थिक संकटात सापडला आहे. खतांच्या ५० किलोच्या पिशवीमागे साधारणपणे २०० ते ३०० रुपयांची जादा रक्कम मोजावी लागत असल्याने उत्पादन खर्च आवाक्याबाहेर गेला आहे.

खते जुने दर नवे दर
१०.२६.२६ : जुने दर १८५०, नवीन दर २१००
१९.१९.१९ : जुने दर -१७६०, नवीन दर- २०००
२४.२४.०० : जुने दर -१८००, नवीन दर- १९००
२०.२०.१३ : जुने दर -१३००, नवीन दर- १५५०
१५.१५.१५ : जुने दर -१४७०, नवीन दर- १६५०
ब्ल्यू कॉपर : जुने दर -३५०, नवीन दर-४००
रोगर : जुने दर -६००, नवीन दर- ७००
एम४५ : जुने दर -२००, नवीन दर- २५०

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now