
मोफत आरोग्य तपासणीसह होमिओपॅथिक औषधांचे वितरण; शासकीय आरोग्य योजनां बाबत मार्गदर्शन
जळगाव लाईव्ह न्यूज । ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासह आरोग्यविषयक जनजागृती करण्याच्या उद्देशाने डॉ. उल्हास पाटील होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, जळगाव यांच्या वतीने २७ ऑक्टोबर रोजी निमखेडी येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.
ग्रामस्थांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात हे शिबिर पार पडले.शिबिरात नागरिकांची आरोग्य तपासणी करून आवश्यकतेनुसार होमिओपॅथिक औषधांचे मोफत वितरण करण्यात आले. तसेच आयुष्मान भारत योजना व अन्य शासकीय आरोग्य योजनांची माहिती देऊन पात्र रुग्णांना मोफत शस्त्रक्रिया व उपचारांचा लाभ मिळविण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले. ग्रामीण भागातील गरजू रुग्णांना योग्य उपचारांची माहिती मिळावी आणि आर्थिक अडचणींमुळे उपचारांपासून वंचित राहावे लागू नये, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश होता.
या शिबिरात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विद्यानंद उद्धव आठवले, प्राध्यापक डॉ. विपुल शिलाहार, डॉ. टोमर, डॉ. रोशनी ललवानी, डॉ. सानिका राय तसेच सह-इंटर्न्स यांनी सहभाग घेतला. वैद्यकीय पथकाने ग्रामस्थांना आरोग्यविषयक मार्गदर्शन केले.शिबिराच्या यशस्वितेसाठी सरपंच सौ. पल्लवी सतीश पाटील, श्री. दत्तात्रय वसंत पाटील, सौ. रंजना दत्तात्रय पाटील, श्री. लोटूबा वसंतराव पाटील, श्री. सतीश हरिदास पाटील व श्री. कृष्णा पाटील यांनी सहकार्य केले. महाविद्यालयाच्या वतीने त्यांच्यासह सहकार्य करणार्या सर्व ग्रामस्थांचे आभार व्यक्त करण्यात आले.





