जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । जर तुम्हीही रेल्वेमध्ये नोकरीचे स्वप्न पाहत असाल तर तुमच्यासाठी ही एक सुवर्णसंधी आहे मध्य रेल्वेने अप्रेंटिसशिप अंतर्गत एकूण २४१८ पदांसाठी भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. या भरतीद्वारे भुसावळ विभागात ४१८ रिक्त जागा आहेत. Central Railway Bharti 2025

ही भरती विविध ट्रेडमध्ये केली जाईल. या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु झाली असून इच्छुक आणि पात्र उमेदवार ११ सप्टेंबर २०२५ सायंकाळी ५ वाजेपर्यंत अर्ज करू शकतो. लक्ष्यात असू द्या अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन असेल आणि त्यासाठी www.rrccr.com या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करता येईल. Central Railway Recruitment 2025

विभागनीय पद संख्या
मुंबई – 1582
भुसावळ – 418
पुणे – 192
नागपूर – 144
सोलापूर – 76
शैक्षणिक पात्रता
उमेदवार किमान ५० टक्के गुणांसह दहावी उत्तीर्ण असावा. याशिवाय, संबंधित ट्रेडमध्ये राष्ट्रीय व्यापार प्रमाणपत्र (NTC) असणे अनिवार्य आहे, जे मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून (ITI) मिळवलेले आहे.
वयोमर्यादा
मध्य रेल्वेमधील पदांसाठी अर्ज करण्यासाठी, उमेदवाराचे वय १५ ते २४ वर्षांच्या दरम्यान असावे. OBC उमेदवारांना वयात ३ वर्षांनी सूट देण्यात आली आहे. अनुसूचित जाती आणि जमातीच्या उमेदवारांना कमाल वयोमर्यादेत ५ वर्षांची सूट देण्यात आली आहे.
अर्ज फॉर्म फी-
जनरल, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस श्रेणीतील उमेदवारांना १०० रुपये अर्ज फी भरावी लागेल. याशिवाय, अनुसूचित जाती, जमाती, अपंग आणि महिला उमेदवारांसाठी कोणतेही अर्ज फी नाही. उमेदवारांना फक्त ऑनलाइन पद्धतीने अर्ज फी जमा करावी लागेल.
निवड प्रक्रिया-
उमेदवारांची निवड आयटीआय आणि दहावीमध्ये मिळालेल्या सरासरी गुणांच्या आधारे केली जाईल. त्यानंतर गुणवत्ता यादी तयार केली जाईल. गुणवत्ता यादीत समाविष्ट असलेल्या उमेदवारांना कागदपत्र पडताळणीसाठी बोलावले जाईल.
अर्ज कसा करायचा?
अर्ज करण्यासाठी, प्रथम www.rrccr.com या वेबसाइटला भेट द्या.
होमपेजवरील “ऑनलाइन अर्ज” या लिंकवर क्लिक करा.
नोंदणी करा आणि लॉगिन करा.
आवश्यक तपशील भरा आणि कागदपत्रे अपलोड करा.
आता अर्ज शुल्क भरा.
शेवटी फॉर्म सबमिट करा आणि त्याची प्रिंट आउट घ्या.
| भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : | येथे क्लीक करा |
| ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : | येथे क्लीक करा |











