बँकिंग क्षेत्रात करिअरची सुवर्णसंधी ! सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये जम्बो भरती, पगार १.२० लाख रुपयापर्यंत

मार्च 6, 2026 11:55 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । बँकिंग क्षेत्रात करिअर करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी एक उत्तम संधी आली आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये सध्या भरती जाहीर करण्यात आली असून विविध पदांसाठी ही भरती होणार आहे. या भरती मोहिमेद्वारे बँक एकूण २७५ रिक्त पदे भरण्यात येणार असून इच्छुक आणि पात्र उमेदवार centralbankofindia.co.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. Central Bank of India Bharti 2026

Central Bank of India Bharti

कोणती पदे भरली जाणार?

सेंट्रल बँकेत सॉफ्टवेअर डेवलपर, मोबाईल डेवलपर, आयटी ऑफिसर अशा विविध पदांसाठी भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २३ मार्च २०२६ आहे.

भरतीसाठी पात्रता काय?

सेंट्रल बँक ऑफ इंडियामधील या नोकरीसाठी उमेदवारांची शैक्षणिक पात्रता पदानुसार वेगवेगळी असणार आहे. वेब सर्वर अॅडमिनिस्ट्रेशन पदासाठी बी.ई, बीटेक, एमटीएससोबत स्केल २ पदांसाठी ४ वर्षांचा अनुभव असावा. डेटा आर्किटेक्ट आणि डेटा इंजिनियर पदासाठी बी.ई/बीटेक/एमसीए डिग्री प्राप्त केलेली असावी. डेटा गवर्नंस पदासाठी बी.ई/बीटेक/एमसीएसोबत ६ वर्षांचा अनुभव असावा.या नोकरीसाठी ३० ते ४५ वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. राखीव श्रेणींना (SC/ST/OBC/PwBD) सरकारी नियमांनुसार वयात सूट दिली जाईल.

इतका पगार मिळेल?

सेंट्रल बँकेतील या नोकरीसाठी उमेदवारांची निवड लेखी परीक्षा आणि इंटरव्ह्यूद्वारे होणार आहे. लेखी परीक्षा एप्रिल महिन्यात होणार आहे. या नोकरीसाठी निवड झाल्यावर उमेदवारांना ४८४८० ते १,२०,९४० रुपये पगार मिळणार आहे.

अर्ज कसा करायचा?

1. बँकेची अधिकृत वेबसाइट, centralbankofindia.co.in ला भेट द्या.
2. होमपेजवरील ‘करिअर’ टॅबवर क्लिक करा.
3. “रिक्रूटमेंट ऑफ स्पेशालिस्ट ऑफिसर्स २०२५-२६” लिंक निवडा.
4. ‘नवीन नोंदणी’ वर क्लिक करा आणि तुमची माहिती भरा.
5. तुमचा फोटो, स्वाक्षरी आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
6. अर्ज शुल्क भरा आणि फॉर्म सबमिट करा.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now