⁠ 
शनिवार, नोव्हेंबर 23, 2024
Home | नोकरी संधी | 10वी पास उमेदवारांना सेंट्रल बँकेत नोकरीची सुवर्णसंधी! 484 पदांसाठी भरती

10वी पास उमेदवारांना सेंट्रल बँकेत नोकरीची सुवर्णसंधी! 484 पदांसाठी भरती

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । १०वी पास उमेदवारांना सरकारी बँकेत नोकरीची उत्तम संधी चालून आली आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडियाने काही रिक्त पदांसाठी भरती आयोजित करण्यात आलेली आहे. सेंट्रल बँकेने सब-स्टाफ पदासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. अर्ज करण्यासाठी, तुम्हाला सेंट्रल बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज भरण्याची अंतिम तारीख ९ जानेवारी २०२४ आहे. Central Bank of India Bharti 2024

शैक्षणिक पात्रता : अर्ज करण्यासाठी, उमेदवाराने मान्यताप्राप्त बोर्डातून 10वी म्हणजेच SSC किंवा त्याच्या समकक्ष परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा :18 ते 26 वर्षे

निवड कशी होईल?
या पदांसाठी उमेदवारांची निवड लेखी परीक्षा आणि स्थानिक भाषा चाचणीद्वारे केली जाईल. पहिली परीक्षा ऑनलाइन घेतली जाईल आणि उमेदवाराला स्थानिक किंवा प्रादेशिक भाषेचे चांगले ज्ञान असणे आवश्यक आहे. असे झाले तरच ते अर्ज करू शकतात. परीक्षेची तारीख अजून आलेली नाही पण बहुधा फेब्रुवारी महिन्यात परीक्षा घेतली जाईल.

एवढी फी भरावी लागणार?
या पदांसाठी अर्ज करण्यासाठी, SC, ST, PWBD आणि महिला उमेदवारांना 175 रुपये शुल्क भरावे लागेल. तर इतर सर्व उमेदवारांसाठी 850 रुपये शुल्क आहे. यामध्ये जीएसटीचा समावेश करण्यात आला आहे, तो वेगळा भरावा लागणार नाही.

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 09 जानेवारी 2024
परीक्षा (Online): फेब्रुवारी 2024
जाहिरात (Notification): पाहा
Online अर्ज: Apply Online

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.