जळगाव लाईव्ह न्यूज । गुरू ब्रह्मा गुरू विष्णु, गुरु देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरुवे नमः या श्लोकाची सांगता करत.. गोदावरी इंग्लिश मीडियम सीबीएसई शाळेत गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.
कार्यक्रमाची सुरुवात शाळेचे मुख्याध्यापिका सौ. नीलिमा चौधरी यांच्या स्वागतपर भाषणाने झाली. त्यांनी गुरुपौर्णिमेचे महत्त्व विषद केले. आणि विद्यार्थ्यांना गुरूंप्रती आदर दाखवण्याचे आवाहन केले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी गुरुंच्या चरणी वंदन करीत, गुरु वंदना सादर केली.शाळेतील विद्यार्थ्यांनी नृत्य, गाणी, नाटक आणि भाषणांच्या माध्यमातून गुरूंचे महत्त्व अधोरेखित केले. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून सर्व शिक्षकांना सन्मान देण्यात आला. विद्यार्थ्यांना योग्य ते मार्गदर्शन आणि शिक्षणात गुरुंच्या भूमिकेचे महत्त्व पटवून देण्यात आले.
कार्यक्रमाच्या शेवटी शाळेच्या मुख्याध्यापकांनी सर्व विद्यार्थ्यांचे आणि शिक्षकांचे आभार मानले आणि अशा कार्यक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळते, असे सांगितले. गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमामुळे शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये गुरूंप्रती आदरभाव वाढला असून, त्यांनी या कार्यक्रमाचा मनसोक्त आनंद घेतला.