⁠ 
शुक्रवार, मार्च 29, 2024

सुकळी येथे शिवजयंती उत्साहात साजरी

जळगाव लाईव्ह न्यूज । सुभाष धाडे । मुक्ताईनगर तालुक्यात विविध ठिकाणी शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. सुकळी येथे शिवजयंतीनिमित्त आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते. आमदार चंद्रकांत पाटील यांनी धावती भेट घेऊन उपस्थिती दर्शवत महारांच्या प्रतिमेचे पुजन करुन वंदन केले व आरोग्य शिबिराचे उद्घाटन केले.

वंदनीयाहेब ठाकरे वैद्यकिय मदत कक्ष, शिवसेना परिवार सुकळी व गोदावरी फाउंडेशन यांच्या सयुक्त विद्यमाने मोफत मोतीबिंदू तपासणी व शस्रक्रिया शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. गावातील अनेक गरजुंनी लाभ घेतला. तसेच सायंकाळी शिवजयंतीचे औचित्य साधून वकृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. अठरा वर्षे वयोगटाखालील मुला-मुलींना राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल भाषण करण्याचे आवाहन सभापती विकास पाटील तसेच शिवसेना परीवार सुकळी यांच्या वतीने करण्यात आले. दरम्यान ३५ मुला-मुलींनी सहभाग नोंदवित उत्कृष्ट भाषणे दिली. स्पर्धकांनी शिवगीते गाऊन व भाषणांच्या माध्यमातुन शिवरायांची महिमा सांगितली. यात प्रामुख्याने सात वर्ष वयोगटाखालील चिमुकल्या लेकरांनी छान भाषणे देऊन उपस्थितांची मने जिंकली.अर्पिता पाटील या सहा वर्षिय चिमुकलीने इग्रजी भाषेतुन महाराजांबद्दल भाषण केले. चिमुकल्यांनी सादर केलेल्या गीतांमुळे व भाषणामुळे उपस्थित पुरते भारावले गेले. माजी सभापती विकास पाटील यांचेतर्फे टाॅफीचे बक्षीस वाटप करण्यात आले.

या स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे बक्षीस दिक्षा विजय पाटील, द्वितीय बक्षीस मयुरी आनंदा पाटील, तृतीय क्रमांकाचे बक्षीस रिया ऊमेश पाटील या मुलींनी मिळवले.तसेच सहभागी स्पर्धकांना शिवरायांची प्रतिमा,वही-पेन तसेच रू १०१ चे प्रोत्साहीत बक्षीसांचे वाटप करण्यात आले. प्रसंगी गावचे प्रतिष्ठित नागरिक माणिकराव पाटील, पोलीस.पा संदिप इंगळे, माजी सभापती विकास पाटील, सुनिल पाटील, जितेंद्र पाटील, पंढरीनाथ पाटील, धोंडु पाटील, कल्पेश पाटील, किशोर पाटील, कुंदन पाटील, कडु कोळी, विजय पाटील, आनंद पाटील, नत्थु कोळी, विकास, ग्रामस्थ उपस्थित होते.