⁠ 
शनिवार, डिसेंबर 14, 2024
Home | जळगाव जिल्हा | जामनेर | माझा वाढदिवस वायफळ खर्च न करता साध्या पद्धतीने साजरा करा – गिरीश महाजन

माझा वाढदिवस वायफळ खर्च न करता साध्या पद्धतीने साजरा करा – गिरीश महाजन

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज | १५ मे २०२२ | आमदार गिरीश महाजन यांचा वाढदिवस वायफळ खर्च न करता साध्या पद्धतीने साजरा करण्याचे आमदार महाजन यांचे पत्रकार परिषदेत आवाहन केले. जामनेर येथे राज्याचे माजी जलसंपदा तथा वैद्यकीय शिक्षण मंत्री आमदार गिरीष महाजन यांच्या निवासस्थानी  पत्रकार परिषद घेण्यात आली होती.

पत्रकार परिषद घेण्याचा उद्देश येणाऱ्या १७ तारखेला आमदार गिरीष महाजण यांचा वाढदिवस असून आमदार गिरिष महाजण यांनी पत्रकार परिषदेत सर्व नागरिकांना आव्हान केले की कोणीही बॅनर लावू नये, जाहीरात करू नये, वाढदिवस साजरा करायचा असेल तर गोरगरीबांना मदत करा, रक्तदान शिबीराचे , आरोग्य शिबिराचे आयोजन करा, जे अत्यंत गरजू व्यक्ती असेल अशा लोकांना मदत करा, कुठल्याही प्रकारचे वायफाळ खर्च न करता अगदी साध्या पद्धतीने वाढदिवस साजरा करणार असल्याचे आमदार गिरीष महाजण यांनी सांगितले

महाराष्ट्रातील एकंदरीत परिस्थिती बघता वाढदिवसाच्या जाहिराती, फलक, पुरवण्या आदी गोष्टीवर खर्च न करता दुष्काळ ग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना मदत करा. त्याच मला अनमोल शुभेच्छा असतील असे आमदार गिरीष महाजन यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना व आमदार महाजन यांच्यावर प्रेम करणाऱ्या आव्हान केले आहे

पत्रकार परिषदेस भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष प्राध्यापक शरद पाटील, गटनेते डॉ. प्रशांत भोंडे , जामनेर तालुका एज्युकेशन संस्थेचे सचिव जितेंद्र पाटील, नगरसेवक महेंद्र बाविस्कर, गोलू झाल्टे, दिपक तायडे,  भाजप पदाधिकारी उपास्थित होते.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह