जळगाव लाईव्ह न्यूज । २८ डिसेंबर २०२१ । पारोळा तालुक्यातील शेळावे बुद्रुक येथे २३ रोजी किसान दिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला झुआरी ॲग्रो केमिकल्सचे जिल्हा प्रतिनिधी किरण शेळके, कृषी विज्ञान केंद्राचे डॉ. दिनेश पाटील, शेळवे येथील पंचायत समितीचे माजी उपसभापती दीपक पाटील, माजी सरपंच मधुकर पाटील, तलाठी आदींची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी डॉ.दिनेश पाटील यांनी कापूस पिकात कीड व्यवस्थापन, रासायनिक खतांचा संतुलित वापर याबाबत मार्गदर्शन केले. झुआरी ॲग्रोचे व्यवस्थापक किरण शेळके यांनी माती परीक्षण, खत खरेदीसाठी आधार कार्डचा वापर आणि कंपनीच्या उत्पादनांबद्दल माहिती दिली. कार्यक्रमास शेतकऱ्यांची उपस्थिती होती. या वेळी अन्य विषयांवर ही मार्गदर्शन करण्यात आले.
हे देखील वाचा :
- चिंता वाढवणारी बातमी! जळगावातील अनेक भागात भूगर्भातील पाणीपातळी घटली…
- शेतकऱ्यांचे खरिपाचे बजेट कोलमडणार ; बियाण्यांच्या किमतीत मोठी वाढ, पहा नवे दर..
- jalgaon : कांदा निर्यातबंदीचा असाही फटका ; दरात 1200 रुपयांची घसरण
- शासकीय कापूस खरेदीबाबत मोठी अपडेट; शेतकऱ्यांनो कापूस विक्री आधी हे वाचा
- पीक विमा भरपाईवरुन डॉ. उल्हास पाटलांचा राज्य सरकारवर निशाणा, ७८ हजार शेतकऱ्यांच्या वतीने केली ‘ही’ मागणी