जळगाव लाईव्ह न्यूज । १५ एप्रिल २०२२ । जळगाव शहरातील खेडी परिसरात असलेल्या पेट्रोल पंपावर लावलेला कंटेनर रिव्हर्समध्ये बाहेर काढण्याच्या प्रयत्नात कंटेनरचा धक्का मागच्या बाजूला असलेल्या इलेक्ट्रीक डीपीला लागला. चालकाला अंदाज न आल्याने तो कंटेनर बाहेर काढणार तोच शॉक लागून त्याचा जागीच मृत्यू झाला. सर्व धक्कादायक प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.