गावठी कट्ट्यासह भर चौकात तरुणाच्या मुसक्या आवळल्या

मार्च 1, 2022 9:43 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १ मार्च २०२२ । जळगाव शहरातील पांडे चौकातून गावठी कट्टयासह एका तरुणाला एमआयडीसी पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने अटक केली आहे. पवन उर्फ माठया केशव गावळे (24) रा. संभाजी चौक, शिवाजी नगर, जळगाव असे अटकेतील तरुणाचे नाव आहे.

caught youngster with gawthi katta jalgaon city

शहरातील पांडे डेअरी चौक परिसरात एक तरुण गावठी पिस्तूल घेऊन फिरत असल्याची माहिती हवालदार मिलींद सोनवणे यांना मिळाली होती. घटनेबाबत त्यांनी लागलीच इतरांना कळवली आणि त्यानुसार सदरची कारवाई करण्यासाठी उपनिरीक्षक दिपक जगदाळे, सहायक फौजदार आनंदसिंग पाटील, सहायक फौजदार अतुल वंजारी, पो.हे.कॉ. मिलींद सोनवणे, पोलिस नाईक विकास सातदिवे, सचिन पाटील यांचे पथक रवाना झाले.

पांडे डेअरी चौकात ए.यु.स्मॉल फायनान्सजवळ पवन उर्फ माठया केशव गावळे वय-२४ हा संशयास्पदरित्या घुटमळत असताना पथकाला दिसून आला. त्याला पोलिसांचा संशय आल्याने तो पळून जाऊ लागला. पोलिसांनी पाठलाग करीत त्याला पकडले. पंचासमक्ष त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या कमरेला १५ हजार किमतीची गावठी बनावटीचे पिस्तूल मिळून आली.

याबाबत पो.कॉ. छगन तायडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार भारतीय हत्यार अधिनियम कायद्यानुसार तसेच मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) (3) कायद्याचे उल्लंघन केल्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हवालदार मिलिंद सोनवणे करीत आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now