यावल तालुक्यात 16 कोटींचा पीक विमा घोटाळा उघड; आठ CSC केंद्र चालकांवर गुन्हे दाखल

मार्च 19, 2026 3:13 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । यावल तालुक्यातील जनसुविधा केंद्रांद्वारे प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत तब्बल ₹16 कोटी 63 लाख 48 हजार 85 रुपयांची फसवणूक उघडकीस आली आहे. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून तपास वेगाने सुरू आहे.

crime 2 jpg webp

फिर्यादी भरत वामन वारे यांच्या तक्रारीनुसार साकळी, निमगाव, मनवेल, भालोद, मोहाळे आणि यावल येथील विविध CSC केंद्र चालकांनी शेतकऱ्यांकडून 7/12 उतारा, आधार कार्ड आणि बँक पासबुकसारखी कागदपत्रे घेतली, मात्र प्रत्यक्षात पीक नसलेल्या क्षेत्राचे खोटे दाखले तयार करून विमा रक्कम मिळवण्याचा कट रचला.

तपासात असेही उघडकीस आले की, 2041 शेतकरी प्रभावित झाले असून 2437.39 हेक्टर क्षेत्राचे बनावट नोंदणी केली गेली, ज्यात 1089.28 हेक्टर अतिरिक्त क्षेत्राची खोटी माहिती दाखवून शासनाला दिशाभूल करण्यात आली. या प्रकरणात संबंधित CSC केंद्र चालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून सध्या पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now