जळगाव जिल्हा

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त करिअर महायात्रा

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ फेब्रुवारी । छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त नोबेल फॉउंडेशन संचलीत यशवर्धिनी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रातर्फे १५ फेब्रुवारी ते २० मार्च या काळात “यशवर्धिनी करियर महायात्रेचे” आयोजन करण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर चालणाऱ्या तरुणांना घडविण्यासाठी विविध करियर्स बाबत या संवाद यात्रेत मार्गदर्शन केले जाणार आहे.

कोरोना महामारी च्या उदासीन अवस्थेतून सावरण्यासाठी संपूर्ण खानदेशात तसेच महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात करियर महायात्रे अंतर्गत 51 व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले आहे. या व्याख्यानांद्वारा नोबेल फाऊंडेशनचे संस्थापक, स्पर्धा परीक्षा तज्ञ जयदीप पाटील पन्नास हजाराहून अधिक तरुणांशी व विद्यार्थ्यांची संवाद साधणार आहेत. शिक्षण क्षेत्रात सलग महिनाभरात 51 व्याख्यानांचा हा अनोखा विक्रम ठरणार आहे.

या अंतर्गत विविध शहरांमध्ये व खेड्यांमध्ये आयएएस, युपीएससी-एमपीएससी, बँकिंग, पीएसआय विक्रीकर निरीक्षक, आयआयटी, मेडिकल या क्षेत्रांबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. तसेच तरुणांना मार्गदर्शन वर्ग देखील उपलब्ध केले जाणार आहेत. करियर महायात्रे अंतर्गत जळगाव शहरात सहा महाविद्यालयांमध्ये तसेच धरणगाव ,अमळनेर ,चोपडा, भडगाव, यावल, पाचोरा, एरंडोल, बांभोरी, पाळधी, अमरावती, कारंजा डांभुर्णी, पातोंडा, म्हळसर, शहादा, नंदुरबार, राजूर, कुऱ्हाकाकोडा, अंतुर्ली, मुक्ताईनगर, वरणगाव, रावेर, जामनेर या ठिकाणी व्याख्याने व कार्यशाळा संपन्न होणार आहेत. या उपक्रमांतर्गत ज्या शाळा-महाविद्यालयांना तसेच स्वयंसेवी संस्थांना व्याख्यानांचे आयोजन करावयाचे असल्याच संपर्क साधावा असे आवाहन केले आहे.

सदर महायात्रेच्या आयोजनासाठी विविध महाविद्यालयातील प्राचार्य, शाळांचे मुख्याध्यापक यांचे सहकार्य लाभत आहे. या अभियानाबाबत प्रतिक्रिया देताना नोबेल फाउंडेशनचे जयदीप पाटील म्हणाले की “कोरोना महामारी मुळे ग्रामीण तसेच शहरी भागात युवकांमध्ये चैतन्य कमी झाले आहे. तरुणांना मार्गदर्शनाची गरज आहे. खेड्यापाड्यात तरुणांना स्पर्धा परीक्षा आणि उद्योग व्यवसाय याचे प्रत्यक्ष मार्गदर्शन करून खानदेशात सकारात्मक वातावरण निर्मिती करणार आहोत.

हे देखील वाचा :

Related Articles

Back to top button