⁠ 
गुरूवार, मार्च 28, 2024

सिनेट निवडणुकीच्या रिंगणात उतरणार युवासेना, १ लाख मतदार नाेंदणीचे उद्दिष्ट

जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ मार्च २०२२ । महाराष्ट्रात आगामी काळात होणाऱ्या सिनेट निवडणुकांसाठी युवासेना सज्ज झाली आहे. ज्याप्रमाणे मुंबई विद्यापीठात १० पैकी १० जागा युवासेनेने निवडून दाखवल्या आहेत. आता कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातही निवडणुकीसाठी जळगाव, धुळे, नंदुरबार या तीनही जिल्ह्यांत प्रत्येकी एक लाख मतदार नोंदणीचे उद्दिष्ट आहे. नोंदणीतील अडचणी दूर करण्यासाठी मंत्री आदित्य ठाकरे यांनी प्रत्येक विद्यापीठात सात सदस्यांची समिती स्थापन केली आहे. त्याद्वारे नोंदणी प्रक्रिया राबवली जाणार असल्याचे युवासेना सचिव वरूण सरदेसाई यांनी येथे नमूद केले.

आगामी काळात होणाऱ्या विद्यापीठ सिनेट निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बुधवारी जिल्हा नियोजन भवन येथे युवासेनेतर्फे निश्चय मेळावा घेण्यात आला. त्यात ते बोलत होते. व्यासपीठावर पालकमंत्री गुलाबराव पाटील, शिवसेना संपर्कप्रमुख संजय सावंत, आमदार चिमणराव पाटील, आमदार किशोर पाटील, आमदार लता सोनवणे, आमदार चंद्रकांत पाटील, सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे यांच्यासह युवासेना कार्यकारिणी सदस्य अंकित प्रभू, युवासेना उत्तर महाराष्ट्राचे विभागीय सचिव अविष्कार भुसे, मुंबई विद्यापीठाचे सिनेट सदस्य मिलिंद साटम, विस्तारक कुणाल दराडे, युवासेना महाराष्ट्र राज्य सहसचिव विराज कावडीया, योगेश निमसे, विस्तारक किशोर भोसले आदी उपस्थित होते. प्रत्येक कार्यकर्त्याने पदवीधरांची नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन सिनेट सदस्य विष्णू भंगाळे यांनी केले.