---Advertisement---
आरोग्य बातम्या राष्ट्रीय

कॅन्सरच्या पेशी 99% नष्ट करण्याचा वेगळा मार्ग सापडला; शास्त्रज्ञांचे मोठं संशोधन..

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ डिसेंबर २०२४ । जगभरातील मृत्यूचे प्रमुख कारण असलेल्या कॅन्सरबाबत (Cancer) शास्त्रज्ञांनी मोठी प्रगती केली आहे. नुकत्याच झालेल्या एका अभ्यासातून असं दिसून आलं आहे की, कॅन्सरच्या पेशी 99% ने नष्ट करण्याचा एक वेगळा मार्ग सापडला आहे.

Cancer study

काय आहे हे संशोधन?
अमेरिकेतील (America) राइस युनिव्हर्सिटी, टेक्सास ए अँड एम युनिव्हर्सिटी आणि युनिव्हर्सिटी ऑफ टेक्सासच्या शास्त्रज्ञांच्या टीमने हे संशोधन केले आहे. या अभ्यासात ‘नियर-इन्फ्रारेड लाइट’ (Near-Infrared Light) आणि ‘अमिनोसायनिन’ (Aminocyanine) नावाच्या मॉलिक्यूलचा वापर करण्यात आला आहे. हे मॉलिक्यूल कॅन्सरच्या पेशींचा पडदा तोडण्यास सक्षम आहेत आणि आधीच बायोइमेजिंग आणि कॅन्सर शोधण्यासाठी वापरले गेले आहेत.

---Advertisement---

कसं काम करतं हे तंत्रज्ञान?
राइस युनिव्हर्सिटीचे केमिस्ट जेम्स टूर यांनी या मॉलिक्यूलला ‘मॉलेक्युलर जॅकहॅमर’ असं म्हटलं आहे. हे रेणू पूर्वीच्या कॅन्सर मारणाऱ्या रेणूंपेक्षा लाखो पटीने वेगवान आहेत. नियर-इन्फ्रारेड लाइटच्या संपर्कात आल्यावर हे मॉलिक्यूल कंपन करू लागतात, ज्यामुळे कॅन्सरच्या पेशींचा पडदा तुटतो आणि त्यांचा पूर्णपणे नाश होतो. हे तंत्रज्ञान शरीराच्या आत खोलवर हाडं आणि अवयवांमध्ये उपस्थित कॅन्सर बरा करू शकते, आणि हे कोणत्याही शस्त्रक्रियेशिवाय होऊ शकते.

संशोधनाचा परिणाम
संशोधकांनी प्रयोगशाळेत विकसीत केलेल्या कॅन्सरच्या पेशींवर या तंत्राचा वापर करून पाहिला. यावेळी त्यांना 99% यश मिळाल्याचं पाहायला मिळालं. याशिवाय, त्यांनी या तंत्रज्ञानाची उंदरांवरही चाचणी केली, त्यापैकी निम्मे पूर्णपणे कॅन्सरमुक्त झाले. राईस युनिव्हर्सिटीचे शास्त्रज्ञ सिसेरॉन आयला-ओरोज्को यांनी सांगितलं की, कॅन्सरच्या पेशी नष्ट करण्यासाठी आण्विक स्तरावरील यांत्रिक शक्तींचा वापर करण्याची ही पहिलीच वेळ आहे. हे तंत्रज्ञान कॅन्सरत्या उपचारात क्रांती घडवू शकते.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---