जळगाव लाईव्ह न्यूज । ११ मार्च २०२४ । केंद्रातील मोदी सरकार लोकसभा निवडणुकीपूर्वी देशात नागरिकत्व दुरुस्ती कायदा 2019 (CAA) लागू करण्याची पूर्ण तयारी करत आहे. या अंतर्गत गृह मंत्रालय आज नागरिकत्व दुरुस्ती कायद्याचे नियम अधिसूचित करणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी थोड्याच वेळात याबाबत जनतेची संवाद साधणार आहेत.
नागरिकत्व सुधारणा विधेयक 11 डिसेंबर 2019 मध्ये संसदेत पारित करण्यात आले होते. त्यानंतर एका दिवसात राष्ट्रपतींनी या विधेयकावर स्वाक्षऱ्या केल्या होत्या. देशात सीएए कायदा (CAA Law) लागू करणार असल्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले होते. त्यानंतर आता गृहमंत्रालय अॅक्शन मोडवर आले आहे. हा कायदा 31 डिसेंबर 2014 पर्यंत किंवा त्यापूर्वी पाकिस्तान, भारत आणि बांगलादेशातून भारतात आले आहेत. अशा लोकांसाठी महत्वपूर्ण ठरणार आहे.
कायदा काय आहे ?
या नागरिकत्व सुधारणा कायदा कायद्यामुळे पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान या तीन देशांमधील अल्पसंख्यांकांना भारतीय नागरिकत्व देण्याची तरतूद आहे. धार्मिक छळामुळे ज्या अल्पसंख्याकांना या देशातून पळ काढावा लागला आहे, त्यांना या कायद्यामुळे भारतात नागरिकत्व मिळणार आहे, असे केंद्र सरकारने म्हटले आहे.