चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरधाव बस झाडाला धडकली; धरणगाव तालुक्यातील घटना

ऑगस्ट 28, 2025 4:32 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ ऑगस्ट २०२५ । जळगाव जिल्ह्यात अपघाताच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. अशातच आणखी एका अपघाताची घटना समोर आलीय. यात धरणगावहून बाभळगावकडे जाणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या बसला आज अपघात झाला. भरधाव बसवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाला जाऊन धडकली. या अपघातात चार प्रवाशी जखमी झाले.

DNR bus accident

प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, बस धरणगावहून बाभळगावकडे जात होती. याच दरम्यान बस अतिशय भरधाव वेगाने जात असताना चालकाचे नियंत्रण सुटले आणि रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाला बस धडकली. या भीषण अपघातात चार प्रवाशी जखमी झाले असून त्यातील तिघांना किरकोळ, तर एका प्रवाशाला गंभीर दुखापत झाली आहे.

कंडक्टरसह काही प्रवाशांनी आपत्कालीन दरवाज्यातून बाहेर पडले. या अपघातात जखमी झालेल्या सर्व प्रवाशांना तातडीने धरणगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले होते.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now